Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedजुगार अड्ड्यावर धाड, 1.39 लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर धाड, 1.39 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानीय अपराध शाखेची कारवाई
गोंदिया : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. वरिष्ठांचे दिलेल्या निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंदया विरूद्ध प्रभावी धाड मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने 5 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे स्था. गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीतील डांगोर्ली शेतशिवार नाला परिसरात सापळा रचून धाड कारवाई केली असता 52 तासपत्यावर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळ खेळणाऱ्या 9 इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
तासपत्त्यावर जुगार खेळ खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून आरोपीतांचे अंगझडतीत आणि फळावरील रोख रक्कम 15,400 रु., एकूण 6 नग मोबाईल फोन किमती 49,000 रु. तसेच दोन मोटर सायकली किंमती 75,000 रु., चटई व तासपत्ती किमती 300 रु असा एकुण 1 लाख 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जुगार खेळ खेळणारे आरोपी देवीलाल ग्यानिराम कहनावत वय-40 वर्ष रा. किन्ही, राजकुमार शोभेलाल जमरे वय-40 वर्षे रा. डांगोर्ली, अशोक मंगल नागपुरे वय- 45 वर्षे रा. कोहका, सचिन प्रेमलाल मेश्राम वय-30 वर्षे रा. दासगाव, राधेलाल हनसलाल मेश्राम वय-44 वर्षे रा. डांगोर्ली, राजेद्र रामचंद्र नान्हे वय 33 वर्षे रा. डांगोर्ली, कंचन कमलप्रसाद दमाहे वय-27 वर्षे रा. कोहका, दौलत सुखराम मात्रे वय-40 वर्ष रा. रजेगाव (बगडमारा) ता. किरणापुर जि. बालाघाट (म.प्र), शैलेश नामदेव कुथे वय-28 वर्ष रा. रजेगाव ता. किरणापुर जि. बालाघाट (म.प्र) यांचेविरुध्द पोलीस ठाणे रावणवाडी येथे कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वरिष्ठांच्या निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पो.नि. दिनेश लबडे, स्था.गु. शा. यांचे मार्गदर्शनात सदरची धाड कारवाई पो. उप. नि. महेश विघ्ने, पो.हवा. विठ्ठल ठाकरे, सोमू तुरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, अजय रहांगडाले, स्था.गु. शा. गोंदिया, दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे तसेच पो.हवा. रणजीत बघेले, पो.शि. नरेन्द्र मेश्राम, पो. ठाणे रावणवाडी यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments