भंडारा : मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाचा भरधाव असलेल्या ट्रॅक्टरवरून ताबा सुटला. यामुळे झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे घडली आहे. खेडचंद शेडमाके असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे.अपघाताची माहिती मिळताच काही लोकांनी खेडचांद शेडमाके यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्रकरणाची नोंद केली आहे. पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत. आज होळीच्या पहिल्याच दिवशी अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
ट्रॅक्टरवरील ताबा सुटला; नियंत्रण मिळविताना खाली पडल्याने मृत्यू
RELATED ARTICLES