गोंदिया : कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगावची निवडणूक 30 एप्रिल रोजी होणार आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपासोबत आघाडी करण्यात येवू नये फक्त महाविकास आघाडीतील पक्षासोबत शक्यतो वर युती करावी, अशी सुचना केली. परंतु, 20 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या दिवशी मलेशाम येरोला, संजयकुमार भगतसह काही लोकांनी भाजपशी युती केली. त्यामुळे पक्षविरोधी कृत्यामुळे पक्षात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अशा गद्दारांना त्वरित पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव पी.जी. कटरे यांनी जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्याकडे केली आहे.
गोरेगाव कृषी उत्पन्नन बाजार समितीची निवडणूक 30 एप्रिल रोजी होणार आहे. कॉँग्रेस पक्षाच्या पॅनलकडून लढविणाऱ्या 17 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले. निवडणुकीच्या तयारीसाठी 17 एप्रिल रोजी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली. चर्चेअंती महाविकास आघाडीतील घटक पक्षाशी युती करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे महासचिव डॉ. एन.डी. किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, पी.जी. कटरे व सर्व कार्यकर्ते आणि निवडणूक लढविणारे उमेदवार उपस्थित होते. सभेत सर्वांनी एकजुटीने निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांनी, प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपासोबत आघाडी करयात येवू नये फक्त महाविकास आघाडीतील पक्षासोबत शक्यतो वर युती करावी. भाजपासोबत आघाडी करणाऱ्यावर पक्षविरोधी कृत्य केल्याबद्दल शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यईल, अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या. तर जिल्हाध्यक्षांनी गोरेगाव बाजार समिती निवडणुकीसाठी प्रभारी प्रदेश सचिव अमर वराडे यांची नियुक्ती केली. दरम्यान, 20 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या दिवशी मलेशाम येरोला, संजयकुमार भगत, कैलाश डोंगरे, गोपाल ठाकूर, ससेंद्र भगत, पी.सी. चव्हाण यांनी जगदीश येरोलाचे निर्देशानुसार भाजपशी युती केली. प्रांताध्यक्षांच्या आदेशाला न जुमानता पक्षाला धोका दिला. काही उमेदवाराची उमेदवारी परत करवून पक्षाला अडचणीत आणले. त्यामुळे पक्षाला 18 पैकी 11 जागेवरच उभे करता आले. यांच्या या पक्षविरोधी कृत्यामुळे पक्षात प्रचंड रोष निर्माण झाले आहे. अशा गद्दारांना पक्षातून त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पी.जी. कटरे यांनी जिल्हाध्यक्ष बनसोड यांच्याकडे केली आहे. जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या सुचना व आदेशाचे उल्लंघन झाले असून जिल्हाध्यक्ष यांच्यावर कार्यवाही करतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धोका देणाऱ्यांना पक्षातून निलंबित करा : पी. जी. कटरे
RELATED ARTICLES