Tuesday, May 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedनकली सोने विकणाऱ्या तरूणाची हत्या; पाच जणांना अटक

नकली सोने विकणाऱ्या तरूणाची हत्या; पाच जणांना अटक

गोंदिया : आम्हाला नकली सोने विक्री करून फसवणूक करता असे म्हणत तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत किशोर चुन्नीलाल राठौर (वय ३०, रा. गोंडीटोला, कटंगीकला) याचा मृत्यू झाला. तर संदीप मदनलाल ठकरेले (२३) व देवदीप राजेंद्र जैतवार (१८, रा. गोंडीटोला) हे जखमीं झाले. या तिघांना मारहाण करणारे १६ आरोपी पोलिसांना स्पष्ट झाले असून आणखी आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे.
गोंदिया तालुक्यातील ग्राम गोंडीटोला-कटंगीकला येथील संदीप ठकरेले, किशोर राठौर व देवदीप जैतवार हे तिघेही सोमवारी दुपारी तीन वाजता मोटारसायकलने नकली सोन्याचे झुमर विकण्याकरिता डांगोर्ली येथे गेले होते. यावर आरोपी ओमप्रकाश खिलेश्वर चौधरी (१८), अजय तुरकर (३५), शुभम ऊर्फ राजू दीपचंद ठाकरे (२३), अशोक ठाकरे (४०), आलोक बिसेन (२४, सर्व रा. कोसते, वाराशिवनी) यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत किशोर राठौर याचा मृत्यू झाला. त्यांना मारहाण करणाऱ्या पाच लोकांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींचा समावेश असल्याची बाब पुढे आली आहे. अटक केलेल्या आरोपींना बुधवारी गोंदियाच्या जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या आरोपींना २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या १६ आरोपींवर रावणवाडी पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३८६, ३४१, १४३, १४४, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

ही १६ नावे झाली स्पष्ट
नकली दागिणे विक्री करीत असल्याचा संशय घेऊन बेदम मारहाण केल्याने तरूणाचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या आरोपीत ओम चौधरी (३६), अज्जू तुरकर (३५), शुभम ठाकरे (३३), अशोक ठाकरे (४०), आलोक बिसेन (२४), महेश पटले (२४), राजू क्षीरसागर (२५), प्रदीप भगत (३०), दीपक भोरगडे (२६), रोहित भोरगडे (२८), जागू सोनवणे (३०), पंकज पटले (२७), विजय भोरगडे (३५), अंकित रहांगडाले (२४), जीवनलाल हरीणखेडे (४५), नितीन ठाकरे (२२) व इतर आरोपींना सर्व रा. कोस्ते ता. वाराशिवनी जि. बालाघाट यांच्या समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments