गोंदिया : निवडणूक खर्च निरीक्षक श्री. हर्षवर्धन यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मिडिया सेंटरला भेट देवून मिडिया मॉनिटरींग, मिडिया सर्टीफिकेशन व पेड न्यूज प्रक्रिया बाबत जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडून माहिती घेतली व निवडणूक कामकाजाच्या दृष्टीने काही महत्वाच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी प्रजित नायर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, निवडणूक खर्च नोडल अधिकारी जनार्धन खोटरे, मिडियाचे नोडल अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी श्री. हर्षवर्धन यांनी सांगितले की, मिडिया सेंटरमधून वृत्तपत्रे, टीव्ही वाहिन्या, सोशल मिडिया यावर दररोज मॉनिटरींग करावे. स्वतंत्र रजिस्टर्समध्ये व संगणकावर जाहिराती व न्यूज बाबत नोंदी घ्यावे. उमेदवार निहाय सर्व माध्यमांतील जाहिरातींची विहित नमून्यात नोंद घ्यावी. सर्व माध्यमांतील पेड न्यूजच्या प्रकरणांची उमेदवार निहाय नोंद घ्यावी. आवश्यकतेनुसार समितीची बैठक आयोजित करुन पेड न्यूज व जाहिरातींची प्रकरणे त्यांच्यासमोर ठेवावी. जाहिरात खर्च समितीकडे व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठवावे. मिडिया सर्टिफिकेशन प्रक्रियेमध्ये प्रमाणिकरण अर्ज देतांना स्वतंत्र आवक जावक रजिस्टरमध्ये नोंद घेवून अर्ज स्वीकारल्याची स्वाक्षरी घ्यावी. माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती बैठक आयोजित करावी. प्रमाणिकरणासाठी प्राप्त जाहिरात सीडी/ पेनड्राईव्ह मधील जाहिरात व प्रचार साहित्य काळजीपूर्वक तपासावे. आदर्श आचारसंहिता भंग होणारी दृश्य किंवा छायाचित्रे प्रचार साहित्यात असू नये. समितीचा निर्णय उमेदवारास कळविण्यात यावा. आवक जावक रजिस्टरमध्ये नोंद करुन प्रमाणपत्र द्यावे व मिळाल्याची स्वाक्षरी घ्यावी. दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी यांना विहित नमून्यात सादर करावा. या सर्व प्रक्रियेची नोंद घ्यावी व त्याचा रेकॉर्ड ठेवावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 11 भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ निवडणूक-2024 च्या निवडणूक कामकाजाकरीता जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आलेली असून सदर समितीचे अध्यक्ष जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोंदिया असून समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी आहेत.
निवडणूक खर्च निरीक्षक हर्षवर्धन यांची मिडिया सेंटरला भेट
RELATED ARTICLES