Monday, May 20, 2024
Google search engine
HomeUncategorizedन्यू सीता पब्लिक स्कूल, देवरी (CBSE) च्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय निवड

न्यू सीता पब्लिक स्कूल, देवरी (CBSE) च्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय निवड

गोंदिया : नुकतीच मुंबईत महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांडो चॅम्पियनशिप २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील ३० जिल्हा संघ सहभागी झाले होते. ज्यामध्ये देवरी तालुक्यातील न्यू पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनी आस्था रायसिंग नुरुती हिने सुवर्णपदक पटकावले आहे. तर हिची लखनौ, (यू.पी.) येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद २०२३ मध्ये भाग घेण्यासाठी निवड झाली आहे.
तसेच ज्यूनियर तायक्वांडो स्पर्धेत राजवीर रायसिंग नुरुती यांनी स्वर्ण पदक जिंकले आहे. जिल्हास्तरीय सब-ज्युनियर तायक्वांडो स्पर्धा.- सुवर्णपदक, पार्थ बोपचे – सुवर्णपदक, अभिजित गौरीशंकर वासनिक – राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी सुवर्णपदक मिळवून निवड झाली असून जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२३ मध्ये देवाशिष रवींद्र मारबते याने बाजी मारली आहे. राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत एकल पारंपारिक व एकेरी कलात्मक (अकोला) मध्ये सुवर्णपदक मिळवून निवड झाली आहे. या खेळाडूंचा शाळा संस्थेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, सचिव अंकित अग्रवाल, मुख्याध्यापक अशोक उईके, समन्वयक दिलप्रीतकौर भाटिया, क्रीडा शिक्षक स्वप्नील ठाकरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments