गोंदिया : राज्यात तसे नौकर भरती बंद असून स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही बाह्यस्थ यंत्रणेच्या माध्यमातूनच नौकर भरती किंवा कर्मचारी पुरवठा करण्याचे धोरण राबविले जात आहे.त्यातच गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व पशुसंवर्धन विभागात सध्या संगणक ऑपरेटर भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.त्या भरतीकरीता विशेष करुन काही जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न चालविले होते.मात्र त्या प्रयत्नाला आत्ता यश आले असून आपल्या काही कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांकरीता नियमबाह्यपणे भरती करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.सदर संगणक ऑपरेटर भरतीकरीता कुठल्या वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली,याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर ते सुध्दा कळले नाही.कुुठल्या बाहस्थ यंत्रणेचे निवड याकरीता करण्यात आली,त्याबद्दलही माहिती मिळू शकली नाही.रोजदांरीवर नियुक्त करता येतात का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असतानाच समाजकल्याण ,पशुसंवर्धनसह इतर काही विभागात ऑपरेटर भरती जी केली जात आहे,त्यांना वेतन कुठल्या निधीतून दिले जाणार आहे आणि खरंच गरज आहे काय असे अनेक प्रश्नावर चर्चा रंगली आहे.
पदाधिकाऱ्यांची मर्जी राखण्याकरीता जि.प.मध्ये संगणक ऑपरेटरची भरती?
RELATED ARTICLES