भागी-शिरपूर येथे पशू प्रदर्शनीचे आयोजन
गोंंदिया : आजच्या युगात प्रत्येकच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. शेती क्षेत्रातही नवनवे तंत्रज्ञान व प्रयोग होत आहेत. आजची शेती यांत्रिक शेती झाली असून प्रत्येकच कामासाठी यंत्र उपलब्ध आहेत. मात्र यांत्रिकीकरणाच्या युगात जर शेती वाचवायची असेल तर, पशुधन वाचविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
देवरी तालुक्यातील भागी-सिरपूर येथे शनिवारी देवरी तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी व मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अंबिका बंजार ह्या होत्या तर प्रमख पाहुणे म्हणून उपसभापती अनिल बिसेन, पं. स. सदस्य प्रल्हाद सलामे अनुसया सलामे, सरपंच पुष्पा राऊत, जिल्ह पशुसंवर्धन अधिकारी कांतीलाल पटले, सरपंच भाग्यश्री भोयर- अनुसया कर्मकार, यमुना सुरंकार- कैलास साखरे, जगन सलामे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना कोरोटे म्हणाले की, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांन पशुधन वाचविण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच त्यांच्य पशुधनावर मोफत उपचारही व्हायल हवेत अशी मागणी आमदार कोरोटे यांनी केली.
या प्रसंगी परिसरातील शेतकरी, महिला बच गटाच्या सदस्य व नागरिक मोठ्य संख्येने उपस्थित होते.