Friday, July 26, 2024
Google search engine
HomeUncategorizedपार्ट टाईम नोकरीचे आमिष देणार्‍या ८ जणांवर गुन्हा

पार्ट टाईम नोकरीचे आमिष देणार्‍या ८ जणांवर गुन्हा

गोंदिया: पार्ट टॉईम जॉब मधून लाखो रूपये कमविण्याचे आमिष देऊन तरूणाला ३ लाख ६६ हजाराने फसविण्यात आले. आपल्याला दिलेले टाॅस्क पूर्ण करा आणि लाखो रूपये मिळवा असे आमिष देत तरूणाला दोन वेळा व्याजासह पैसे परत करण्यात आले. परंतु तिसऱ्या वेळपासून त्याला पैसे परत न करता त्याला पैसे पाठविण्यास वारंवार तगादा लावणाऱ्या तिघांसह आठ जणांवर गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथील ओमेरा तिलकचंद कापगते (३०) यांना पार्ट टाईम जॉबची गरज असल्याने ते जॉबच्या शोधात होते. अश्यातच व्हॉटसअप मोबाईलवर अमर नानोरीया या व्यक्तीने २३ सप्टेंबर २०२३ रोजी पार्ट टाईम जॉब देत असल्याचे सांगून त्यांचे खाते क्रमांकवर ऑनलाईन २८ सप्टेंबर रोजी वेगवेगळी रक्कम पाठविण्यास भाग पाडले. त्यांची तब्बल ३ लाख ६६ हजाराने फसवणूक करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आठ जणांवर भादंविच्या कलम ४२०, ३४ सहकलम ६६ (डी) माहीती तंत्रज्ञान कायदा अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे करीत आहेत.प्रिपेड मिशनसाठी म्हणे पैसे भरावे लागतीलकापगते यांचा मोबाईल क्रमांक नैना फतीमा हिच्या टेलीग्रॉम आयडीसी जोडून आरोपीने सांगितले की, तुम्ही यु ट्युब चॅनेलला सबक्राईब केल्यानंतर तुम्हाला आमचे कंपनीमार्फत आपल्यास पैसे मिळणार आहेत. यासाठी त्यांच्या प्रिपेड मिशन ग्रुपला जॉईन करण्यास सांगितले. प्रिपेड मिशनसाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले होते. त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी आरोपींनी पाठविलेल्या लिंकवर पैसे पाठविले.

दोनवेळचे ५० हजार परत मिळाले
२६ सप्टेंबर २०२३ रोजी पाठविलेल्या लिंकवर पाठविलेले तीन हजार त्याचदिवशी ४ हजार ४०० रुपये व्याजासह परत केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा २५ हजार रुपये भरण्यास सांगितले. ते पैसे पाठविले. पुन्हा १० हजार भरण्यास सांगितले ते सुध्दा पाठविले. त्या ३५ हजाराचे १० हजार व्याजासह ४५ हजार पाठवून त्यांचा विश्वास जिंकला.

आरोपीत यांचा समावेश
पार्ट टॉईम जॉब देण्याच्या नावावर ३ लाख ६६ हजाराने फसवणूक करणाऱ्या आरोपीत अमर नानोरीया, नैना फतीमा, रॉयलु कॅफेचे खातेधारक, जॉस्वीन कॉस्मेटचे खातेधारक, ॲंगल इअर्ट मूवर्सचे खातेधारक, जहीरूल इस्लाम,कालींंदी मेडीकल स्टोर्सचे धारक व अजय शर्मा अश्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments