Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedपुरात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह आढळला

पुरात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह आढळला

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरततोंडी-पिंपळगाव मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पुरात मंगळवारला वाहून गेलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली असून आज बुुधवारला आपत्ती निवारण विभागाच्या शोधपथकाने नाल्यापासून एक किमीअंतरावरुन मृतदेह शोधून काढला आहे.सदर इसम झरपडा येथील रहिवासी असून त्याचे नाव अरविंद गणपत ठाकरे( वय 50) असे आहे.अरविंद हा मूळचा चापटी या गावचा रहिवासी आहे.त्याचे सुरगाव येथे शेत आहे.झरपडा येथे घरजावई म्हणून तो वास्तव्यास होता.मंगळवारी तो शेतात लागवड केलेले धानाचे रोप पाहण्यासाठी झरपडा येथून सकाळी सायकलने निघाला.अरततोंडी-पिंपळगाव मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुलावर खूप जास्त पाणी नव्हते.मात्र सायकल हातात असल्याने तो सायकलसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.तलाठी सुरेश हरिणखेडे यांनी आपत्ती निवारण बचाव पथकासह ग्रामस्थांच्या मदतीने मंगळवारी रात्रीपर्यंत नाल्याच्या काठावर शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.तो रात्री घरी परतला नाही.त्यामुळे आज बुधवारला पहाटे अरविंदचे कुटुंबीय घटनास्थळी आले.पुरात वाहून गेलेला अज्ञात इसम हा अरविंदच असल्याची खातरजमा झाली.मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुबियांना सोपवण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments