जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा धोका : 50 विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
गोंदिया : आपत्ती सांगून येत नाही, आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी आपत्तीचे पुर्व नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशिक्षण व जनजागृती हे आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्ती काळात जनजागृती व दक्षता या दोन्ही शस्त्रांचा वापर करुन पुर परिस्थतीवर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी मान्सून पुर्व तयारी 2023 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी आयोजित पुर परिस्थतीत शोध व बचावकार्य प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
यावेळेस निवासी उपजिल्हाधिकारी स्म्तिा बेलपत्रे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूरचे पोलिस निरिक्षक मारोती लांबेवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अग्निशमन अधिकारी निरज काळे, लेखाधिकारी अनिता कोनाळे, सहा.लेखाधिकारी मंदार जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.मनिष धकाते, डॉ. स्निग्ता ठाकुर, डॉ. श्रृती बिसेन, डॉ. पारिश कामडी व श्री अजय डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, मागील वर्षी 2022 मधील पुर परिस्थती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील नियोजन करणे अपेक्षित आहे. आपत्ती काळात पुर परिस्थीतीला तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेऊन कामाचे नियोजन करावे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या रंगीत तालिम व प्रशिक्षणाचा वापर जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने मान्सून काळात येणाऱ्या आपत्तीवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. तसेच जिल्हयातील नद्या, धरणे, जलाशय व इतर ठिकाणी पाण्याचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक असल्यामुळे येणाऱ्या काळात पुर परिस्थीचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे.
या वेळेस निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी सांगितले की, नदी काठावरील गावातील नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती कमी असल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढते. याकरिता गावातील नागरिकांना व विद्यार्थी प्रवर्गाला प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे प्रतिसाद समाजापुढे येतील व पुर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानिचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. उपस्थितांचे मार्गदर्शन करतांना श्रीमती बेलपत्रे यांनी सजग नागरिक सुरक्षित नागरिक असे मनोगत व्यक्त करुन पुराचे प्रकार, पुर येण्याचे कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पुर्व सूचना, हवामान खात्याचे अंदाज इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शोध व बचाव कार्य करताना घेण्यात येणाऱ्या आवश्यक दक्षतेच्या संदर्भात माहिती देऊन त्यांनी आपले अनुभव सांगितले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात दिपक परिहार, इंद्रकुमार बिसेन, चुन्नीलाल मुटकुरे, चिंतामन गिऱ्हेपुंजे, जितेन्द्र गौर, नरेश उके, जसवंत राहांगडाले, रवि भांडारकर, संदिप कराळे, दिनू दिप, राजकुमार खोटेले, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पी.एस.अहिरे, पी.एस. कावडकर, पी.बी. त्रिकाळ, एस.एस. लांजेवार, आर.एम. पाटील, व IRB बटालियन व अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तथा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील एम. बी. बी. एस. चे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुर परिस्थतीवर मात करण्यासाठी जनजागृती व दक्षता महत्वाची शस्त्रे : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
RELATED ARTICLES