आ.विनोद अग्रवाल यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
गोंदिया : मागील अधिवेशनात शेतकऱ्यांना १५ हजार रुपये प्रोत्साहन राशी प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय झाला होता.मात्र ही राशी अत्यंत कमी असून यामुळे प्रोत्साहन मिळणे कठीण असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.शेतकरी बांधवाना संतुष्ट करण्यासाठी प्रोत्साहन राशी मध्ये वाढ केली पाहिजे अशी मागणी घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत प्रोत्साहन राशी किमान २५ हजार रुपये प्रति हेक्टर करण्याची मागणी केली. ज्यावर सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी मंंत्री शंभुराज देसाई, मंंत्री संजय राठोड व माजी मंत्री परिणय फुके हे सुध्दा उपस्थित होते.
प्रोत्साहन राशी २५ हजार करा : आमदार विनोद अग्रवाल
RELATED ARTICLES