Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedबनगाव पाणीपुरवठा योजनेची 1.20 कोटी थकबाकी

बनगाव पाणीपुरवठा योजनेची 1.20 कोटी थकबाकी

लाभान्वित गावांचा पाणी पुरवठा होणार बंद?
गोंदिया : आमगाव, सालेकसा तालुक्यातील 40 गावांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी बनगाव प्रादेशिक गह्यामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद गह्यामीण पाणीपुरवठा विभागामार्फत कार्यान्वित आहे. गह्यामपंचायती लाभार्थ्यांकडून वेळेवर पाणी कराची वसुली करीत नसल्याने 1 कोटी 19 लाख 94 हजार 417 रुपयांचे पाणीकर थकले आहे. ज्या गह्यामपंचायतींकडे 1 लाख रुपयांपेक्षा अधिकचे पाणी कर थकीत आहे, अशा गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय संबंधित विभाग घेणार आहे. तशी सूचना देखील गह्यामपंचायतींना देण्यात आली आहे.
बनगाव पाणीपुरवठा योजना सन 2008 मध्ये सुरू करण्यात आली. योजना सुरू झाल्यापासून कधी वीज पुरवठा खंडित, कधी जलवाहिणीला गळती तर कधी देखभाल व दुरुस्तीचे काम करणार्‍या कंपनीला पैसे न देणे यामुळे बंद पडत आहे. विभागाबरोबरच काही जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी योजना सुरू ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहेत. परंतु, शुद्ध पाणी वापरणारे नळ जोडणीधारक पाणी कर वेळेत देण्यात उदासीन आहेत. गह्यामपंचायतींचे पाणीकर वसुलीचे नियोजनही ढिसाळ आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडे पाणीकर वेळेवर जमा होत नाही. परिणामी, योजना राबविण्यात यंत्रणेला नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रकारामुळे जिप प्रशासन कठोर धोरण अवलंबविणार आहे. ज्या गह्यामपंचायतीकडे 1 लाखापेक्षा अधिकचे पाणीकर शिल्लक आहे, अशा ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे.

आमगाव नपवर 8.60 लाखांचे पाणीकर
आमगाव नगरपरिषद हद्दीत 8 गावांचा समावेश आहे. पैकी 7 गावे लाभक्षेत्रात येतात. आमगाव नगरपरिषदेकडे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची 8 लाख 60 हजार 662 रुपये थकबाकी आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments