Saturday, October 26, 2024
Google search engine
HomeUncategorizedभारत टपाल योजनेची महिला सम्मान योजना महिलांसाठी वरदान बचत योजना

भारत टपाल योजनेची महिला सम्मान योजना महिलांसाठी वरदान बचत योजना

गोंदिया : महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सन 2023-24 च्या आर्थिक धोरणमध्ये खुप मोठी घोषणा करुन महिलांसाठी महिला सम्मान बचत योजना (MSSC) सुरु केली आहे. या योजनेनुसार सर्व महिलांचे व 18 वर्षाखालील मुलींचे खाते सुरु करण्यात येते. सध्या या खात्याचे 7.5 टक्के एवढे वार्षिक व्याज दर आहे. या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2023 रोजी झालेली असून भारतीय डाक विभागाद्वारे याचे संचालन केले जाते. या योजनेची सुरुवात केवळ 2 वर्षासाठी करण्यात आली आहे. या योजनेत महिला केवळ 31 मार्च 2025 पर्यंत रक्कम गुंतवणूक करु शकतात. या योजनेत कमीत कमी 1 हजार रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये पर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते. या योजनेत व्याजाची आकारणी ही त्रेमासिक करण्यात येते आणि ग्राहकांना चक्रवाढ व्याज चा लाभ मिळतो. दोन वर्षानंतर खाते परिपक्व होते.
महिला सम्मान बचतपत्र खाते हे जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस कार्यालयात संपर्क करुन सुरु करता येते. सोबत आपले आधारकार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
गोंदिया जिल्ह्यात 1 एप्रिल 2023 पासून ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 3,554 खाती महिलांनी पोस्ट कार्यालयात उघडली असून एकूण रक्कम 20 कोटी 38 लाख 57 हजार 719 रुपये महिलांनी पोस्ट कार्यालयात गुंतवणूक केलेले आहे.
भारतीय डाक विभागाद्वारे या खाते संदर्भात ‘नारी शक्ती’ म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पासून 8 डिसेंबर 2023 पर्यंत विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व महिलांनी जवळच्या पोस्ट कार्यालयात भेट देवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक अधीक्षक डाकघर, गोंदिया उत्तर उपविभाग, गोंदिया यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments