गोंदिया : जिल्ह्यात दिवाळी नंतर दर वर्षी मंडई मेला ची परंपरा आहे. या निमित्त ग्रामीण भागात मंडई जत्रेचे आयोजन केले जाते तसेच ग्रामीण विभागात मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. फुलचूर टोला, बटाणा, छिपिया या गावात मंडई जत्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल उपस्थित होते. ते म्हणाले की, मंडई जत्रेची परंपरा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. मनोरंजनाची साधने नसताना प्रत्येक गावात मंडई जत्रा भरवली जायची, ती आजही कायम आहे. मंडई मेळ्यात नाटकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात येते. मंडई जत्रेच्या माध्यमातून ग्रामीण भारतात मोठ्या आर्थिक घडामोडी घडतात, ज्यामुळे स्थानिक छोटे दुकानदार आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळते. यंदाही मंडई मेळ्याची परंपरा पुढे नेण्याबाबत आयोजकांचे अभिनंदन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, सेल्स टॅक्स कॉलनी गणेश नगर रोड व पुलासह कारंजा भद्रुतोली रेल्वे आउटपोस्ट रोड येथील रस्त्याचे काम लवकरच मंजूर होणार आहे. आमदार झाल्यानंतर फुलचूर टोला गावात कोटय़वधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले असून भविष्यातही आणखी कामे मंजूर होतील. बटाणा गावातील पाणी समस्येसाठी बोअरवेल मंजूर करण्याबरोबरच बटाणा गावात आतापर्यंत झालेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यात आली, यासोबतच छीपिया गावातही आतापर्यंत झालेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यात आली.
आमदार विनोद अग्रवाल यांनीही आपल्या भाषणात धान खरेदी सुरू झाली असून, यावर्षीही शासन धानाला बोनस देणार आहे. असेही सांगितले तसेच शेतकरी आपला धान तालुक्यातील कोणत्याही धान खरेदी केंद्रावर विकू शकतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला धान विक्री करू इच्छित असलेल्या कोणत्याही केंद्रावर नोंदणी करून विकावे असे आवाहन केले.
मंडई जत्रेतून छोटे दुकानदार आणि उद्योजकांना प्रोत्साहन मिळते : आमदार विनोद अग्रवाल
RELATED ARTICLES