9 फेब्रुवारीला स्व. मनोहरभाई पटेल जयंती दिवस : सुवर्ण पदक वितरण समारंभ
गोंदिया : हर मन के मीत शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या117 व्या जयंतीनिमित्त भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील शालांत आणि पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाºया गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक प्रदान करण्यासाठी 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य सुवर्ण पदक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सुवर्ण पदक वितरण समारंभात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते सुवर्ण पदक व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
सुवर्णपदक वितरण समारंभात कार्यक्रमांचे उद््घाटक राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, विजय दर्डा, उद्योगपती सज्जन जिंदल, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ व प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुवर्ण पदक वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया शिक्षण संस्था, मनोहर भाई पटेल स्मृती समिती, गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. सुवर्ण पदक वितरण समारंभास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांनी केले आहे.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219