Saturday, June 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

गोंदिया : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमीत्त आज सकाळी 8.00 वाजता कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रारंभी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर मैदानावरील परेडचे निरीक्षण केले. पोलीस बँड पथकाने महाराष्ट्र गीत सादर केले. पोलीस पुरुष दल, पोलीस महिला दल, होमगार्ड पुरुष पथक, होमगार्ड महिला पथक, माजी सैनिक दल, एन.एम.डी. कॉलेज गोंदिया एन.सी.सी. पथक, बँड पथक, श्वान पथक, रुग्णवाहिका पथक व अग्नीशमन पथक यांनी परेडचे संचलन केले. यावेळी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात प्रगतशील महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी योगदान द्यावे असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैय्यासाहेब बेहरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुरुनानक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मंजुश्री देशपांडे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments