Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedमुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह राज्यातील चार पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस...

मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह राज्यातील चार पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, तर महाराष्ट्राला 74 पदकं

 

सूत्रन्यूज। मुंबई। राष्ट्रपती पोलीस पदकांची आज बुधवारी 25 जानेवारी 2023 रोजी घोषणा करण्यात आली.यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळालं आहे. याशिवाय 31 जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे आज या पुरस्कार जाहीर झाले आहेत.

कोणाकोणाला राष्ट्रपती पोलीस पदक?

राज्यातील चार अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक मिळवलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. तर 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

देशातील 901 पोलिसांना पदकं जाहीर

देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत.140 जणांना शौर्य पोलीस पदक, 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केलं जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments