जागतीक महिला दिनानिमीत्य बडवाईक मॅडम यांना मानाचा मुजरा.
गोंदिया : वर्षा बडवाईक मॅडम हे गेली ३२ वर्ष गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ.शाळा मेहताखेडा या ठिकाणी अखंडपणे आपले ज्ञानदानाचे कार्य सुरु ठेवले आहे. केवळ एक शिक्षिका म्हणूनच नाही तर समाजाप्रति असणार्या तळमळीतून त्यांनी अनेक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.अशा कर्मठ क्रियाशिल वर्षा बडवाईकं मॅडम यांना जागतीक महिला दिनानिमित्य मानाचा मुजरा.
वर्षा बडवाईक यांनी विद्यार्थी पालक-भेट, माजी विद्यार्थी भेट घडवून कौटुंबिक संबंध जोडले. गणित आणि विज्ञान हे किचकट विषय त्यांनी खेळीमेळीने शिकवून विद्यार्थ्यांना त्यात रुची निर्माण केली. शालेय विषयांव्यतिरिक्त त्यांना असलेली संगिताची आवडही त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जोपासली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव दिला.
समाज आणि विद्यार्थ्यांनी नेहमीच बडवाईक मॅडम यांनी आदर्श मानले आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे, नक्षलग्रस्त अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत असण्याकरिता गोंदियाचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे (भा.पो.से.) यांनी शाळेला भेट दिली असता मॅडम चे विशेष अभिनंदन केले आणि त्यांचे कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार केले.
संगीत,कला,क्रीडा यासारखे सर्व गुणसंपन्न असलेल्या या व्यक्तिमत्त्वाने मुख्यमंत्री माझी शाळा सुदंर शाळा या उपक्रमात तालुका स्तरावर सेवा देणा-या मेहताखेडा शाळेला मिळालेल्या द्वितीय क्रमांकामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
वर्षा बडवाईक मॅडम यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक विरेंद्र खोटेले यांनी म्हटले आहे. केवळ एक शिक्षिका म्हणूनच नाही तर समाजाप्रति असणार्या तळमळीतून त्यांनी अनेक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.अशा कर्मठ क्रियाशिल वर्षा बडवाईकं मॅडम यांना जागतीक महिला दिनानिमित्य मानाचा मुजरा.