गोंदिया : मानधनाचे चुकारे प्रलंबित असल्याची तक्रार घेऊन गोंदिया जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांच्या शिष्टमंडळाने जिप.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या दालनात भेट घेतली. प्रलंबित देयके चुकते करण्याचे निर्देश सहसंचालक (तांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचेकडून प्राप्त असतांना सुद्धा देयके वाहनचालकांच्या खात्यात अद्याप वर्ग करण्यात आलेले नसून जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे देयके निकाली काढण्याच्या सूचना जिप.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केल्या आहेत. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आपल्या दालनात बोलावून या विषयावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देखील जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केल्या आहेत. दरम्यान जिप.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी शिष्टमंडळाना मी तुमच्यासोबत असल्याचे आश्वसत करत प्रलंबित देयके मिळेपर्यंत पाठपुरावा सुरु राहणार व सर्वाना प्रलंबित देयके मिळणार अशी ग्वाही दिली.
रुग्णवाहिका चालकांच्या देयके त्वरित निकाली काढ़ा : जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले
RELATED ARTICLES