गोंदिया : गोंदियातील रिंगरोड स्थित हनुमाननगर स्थित रहिवासी गोलु तिवारी यांची सोमवारला रात्री ९ वाजेच्या सुमारास टीबीटोली परिसरात गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने रेती व्ययसायिकात दहशत निर्माण झाली असून अवंती चौकातील सहयोग रुग्णालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिवारी याना सहयोग रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी मित्र मंडळीनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेला आहे. तसेच सहयोग हॉस्पिटल मध्ये तोडफोड करण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे.
रेती व्यवसायिक गोलू तिवारीची गोळी घालून हत्या
RELATED ARTICLES