शासन दरबारी अडकला 25 कोटींचा निधी
गोंदिया : शहराच्या मध्यभागी रेल्वे प्रशासनाच्या जागेवर 26 एकर जागेत प्रशस्त तलाव आहे. या तलावातील पाणी सिंचनाच्या कामी देखील येत नाही. तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी नगर पालिकेचे पदाधिकारी इतर नेते प्रयत्नशील आहेत. दोन वर्षापूर्वी पालिकेने 25 कोटींचा प्रस्ताव तयार करुन राज्य शासनाकडे पाठविला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावावर सकारात्मकता दाखविली. पुढे मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे हा तलाव दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.
शहराच्या पश्चिम भागात रेल्वेच्या मालकीचा तलाव आहे. या तलावातील पाणी आजघडीला रेल्वे प्रशासन वापरत आहे. जुन्या काळात रेल्वे प्रशासनाचे पाण्याची गरज भागविण्यासाठी या तलावाचे बांधकाम केले होते. कालांतराने तलावाच्या दोन बाजूच्या जमिनीवर अतिक्रमण वाढले. तलावात गाळ साचला असून जलपर्णीचे साम्राज्य आहे. हा तलावात सौंदर्यीकरणाच्या प्रतिक्षेत होता. 2018 मध्ये नगर पालिकेचे तत्कालीन अध्यक्ष अशोक इंगळे, नगरसेवक कल्लू यादव, पंकज यादव यांनी पुढाकार घेत तलावाच्या सौदर्यीकरणासाठी प्रयत्न केले. त्यानुसार पालिकेने 27 जुलै 2018 रोजी सौंदर्यीकरणाला मंजुरी दिली व 25 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्यामुळे कित्येक दशकापासून बकाल अवस्थेत असलेल्या हा तलाव कात टाकेल, अशी आशा होती. मात्र, त्यावर कसलीही कारवाई झाली नाही. प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नाही. उल्लेखनीय म्हणजे सौदर्यीकरणानंतर देखील हा तलाव रेल्वेच्या अख्त्यारित राहणार असून देखरेख पालिकेची असणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविली होती.
रेल्वे तलावाचे नशीब उजळणार कधी?
RELATED ARTICLES