गोंदिया : संपूर्ण महाराष्ट्रात मराठमोळी लावणी सादर करणारी नृतिका गौतमी पाटील हीचे लावणी कार्यक्रम सडक अर्जुनी येथे 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पांढरवाडी रोडवरील पटाच्या पटांगणावर करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी तरुणांमध्ये उत्सुकता पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध नृतिका गौतमी पाटील पहिल्यांदाच जिल्ह्यात आहेत.
डॉ.सुगत चंद्रिकापुरे मित्र परिवाराच्या वतीने दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्त 19 रोजी सायंकाळी 6 वाजता लावणी फेम नृतिका गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची गर्दी उसळणार असल्यामुळे आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. तर कार्यक्रम शांततेत व सुव्यवस्थेत पार पडावे यासाठी आयोजकासह पोलीस प्रशासनही कामाला लागल्याचे दिसून येत आहे. लावणी फेम गौतमी पाटील यांचे जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेले लावणी कार्यक्रम पाहण्यासाठी तरुणाई मध्ये उत्सुकता पहावयास मिळत आहे.
लावणी फेम गौतमी पाटील 19 रोजी सडक अर्जुनीत
RELATED ARTICLES