गोंदिया : देवरी येथील लिनेश क्लबच्या वतीने येथील श्रीमती के.एस.जैन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील 1 दिव्यांग विद्यार्थ्याला गणवेशाचे आणि पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप क्लब च्या कॅबिनेट अधिकारी उर्मिला परिहार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य कु.रझिया बेग मॅडम, क्लबच्या शिल्पा बान्ते, कु. शीला मारगाये, कमलेश्वरी गौतम, कु. सुनंदा भुरे मॅडम उपस्थित होत्या. तसेच क्लबच्या माजी अध्यक्ष कु.सुलभा भुते, कु.संगीता पाटील, कु.शुभांगी निनावे, कु.शीतल सोनवणे, कु.वंदना काळे मॅडम, कु.जांभुळकर मॅडम यांच्यासह विद्यालयातील इतर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येंने उपस्थित होते.
लिनेश क्लबच्यावतीने दिव्यांग व शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप
RELATED ARTICLES