Saturday, June 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedवादळाचा तडाखा; विद्युत खांबांची पडझड अनेक घरांचे छत उडाले

वादळाचा तडाखा; विद्युत खांबांची पडझड अनेक घरांचे छत उडाले

गोंदिया : रोहिणी नक्षत्राला सुरूवात झाली आहे. एकीकडे सुर्य आग ओकत आहे. तर दुसरीकडे सायंकाळ होताच वातावरणात  बदल होवून आकाशात ढग दाटून येत आहेत. अशातच (ता.२८) सायंकाळी ५ ते ६ वाजता सुमारास नवेगावबांध परिसराला वादळाचा तडाखा बसला. वादळाने झाडे उन्मळून पडली तर विद्युत खांब  जमिनदोस्त झाले. अनेक घरांचे कवेलू, टिनाचे पत्रे, शेड वादळात सापडल्याने उडाली. यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. जवळपास अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या वादळाच्या तांडवाने नवेगावबांध परिसरात तारांबळ उडाली होती.
सुर्य आग ओकत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर तापमानाचा पारा ४४ अंशावर राहत आहे. पण सायंकाळी होताच वातावरणात बदल होवून आकाशात मेघ दाटून येत आहेत. त्यातच काल, सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसराला जोरदार वादळी वार्‍याचा तडाखा बसला. वादळाचा तांडव सुरू झाल्याने परिसरातील अनेक झाडे आणि विद्युत खांबांची पडझड झाली. काहींच्या घरावरील टीन पत्र्याचे छत  उडाले, तर काहींनी लावलेले सौर पॅनल उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे विद्युत तारा तुटल्या व खांबे कोसळले. जवळपास अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या वादळाने अनेक घर क्षतिग्रस्त झाली तर अनेकांच्या घराचे छत पूर्णत: उडाल्याने उघड्यावर राहण्याची वेळ आली. वादळाच्या तडाख्याने नवेगावबांधसह परिसरात एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
सुसाट वार्‍यासह वादळाला सुरूवात झाली. वादळाचा तडाखा बसल्याने विद्युत खांब जमिनदोस्त झाले. अनेक वृक्ष कोसळून पडले. विज वाहिन्यांचे तार तुटून पडलीत. यामुळे परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला होता. उशिरापर्यंत विज पुरवठा पुर्व करण्याच्या कामाला यंत्रणा लागली होती.मंगळवारी सायंकाळी सुमारास आलेल्या वादळाचा तडाखा नवेगावबांध परिसरातला बसला. वादळासह आलेल्या पावसात कापणी करून ठेवलेले पीक सापडल्याने शेतकर्‍यांना फटका बसला आहे. तर धानासह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत. यामुळे खरीपाची तयारी करीत असलेल्या बळीराजाची चांगलीच कोंडी झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments