जिल्ह्यातील 417 तलावांची दुरुस्ती : सिंचनासह उत्पन्नात झाली वाढ
गोंदिया : जिल्ह्यातील 417 मामा तलावांची विशेष दुरुस्ती करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. या तलावाच्या दुरुस्ती पूर्वी शेतकºयांना 17 कोटी 77 लाखांचे उत्पन्न मिळत होते. आता मामा तलावांच्या दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने परिसरातील शेतकºयांचे उत्पन्न 55 कोटी 27 लाखांवर गेले आहे. म्हणजेच, 37 कोटी 27 लाखांचा शुद्ध नफा शेतकºयांना मिळत आहे.
गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात बाघ इंटियाडोहतंर्गत 5 मोठ्या धरणासह 9 मध्यम प्रकल्प, 22 लघु प्रकल्प, गोंदिया पाटबंधारे विभागाचे 37 मामा तलाव असून जिल्हा परिषदेच्या अख्त्यारितील दीड हजारांवर तलाव आहेत. दरम्यान शासनाकडून जिल्ह्यातील 417 मामा तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून घेण्यात आले आहे. यातंर्गत तलाव खोलीकरणासह इतर कामेही करण्यात आली. या विकास कामांमुळे जिल्ह्यातील सिंचन वाढ झाली आहे. परिणामी पीक उत्पादनही वाढल्याचे दिसून येत आहे. दुरुस्तीपूर्वी कमी पीक घेतले जात होते. आता या पिकाचे क्षेत्र वाढले आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची दुरावस्था झाली होती. या तलावांची दुरुस्ती झाल्याने शेतकºयांच्या उत्पन्न वाढू लागले आहे. तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र शासनाने 2016-17 या वर्षात जिल्ह्यातील 417 मामा तलावांची दुरुस्ती कार्यक्रम हाती घेतला होता. या तलावांच्या दुरुस्तीमुळे 8 हजार शेतकºयांना सिंचनाचा लाभ झाला आहे.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219