गोंदिया : मनोहरभाई पटेल अकॅडमी गोंदिया द्वारा आयोजित व स्वरवेध नागपूर यांच्या प्रस्तुतीतून, कै.पुरूषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून साकार झालेली संगीत कट्यार काळजात घुसली… एक अनुभूती या मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवणाऱ्या दैदीप्यमान अभिजात आणि अजरामर संगीत नाटकाचा प्रयोग दि. 7 ऑक्टोबर 2023 शनिवारला सायंकाळी 06.00 वाजता एन. एम.डी. कॉलेज सभागृह गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
मराठी रंगभूमीचे वैशिष्ट्य म्हणजे संगीत नाटकाचा प्रयोग, नाट्य रसिकांची आणि दिग्गजांची पसंती मिळवणाऱ्या या नाटकाची संकल्पना आणि दिग्दर्शन एडवोकेट भानुदास कुलकर्णी व सारंग मास्टे यांनी केले आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केले असून संगीत संयोजन भानुदास कुलकर्णी, नाटक निर्मिती डॉक्टर सौ.शीला कुलकर्णी व अनुजा परचुरे यांनी केली आहे. शंतनु ठेंगडी, आसावरी – रामेकर – जोशी, केतकी – काणे – सालनकर, ललित घवघवे, सागर पंडित, प्रदुमन बायस्कर, रोहीत घाग्रेकर, अभिलाष भुसारी, निखिल टोंगळे, गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, डॉ मंजीरी वैद्य – अय्यर, आदित्य सावरकर, यश खेर, राधा ठेंगडी, साक्षी सरोदे, श्रुती बाईवार, लक्ष्यती काजळकर या प्रमुख कलाकारांसह नेपत्थ प्रमोद कळमकर व रंगमंच व्यवस्था माधव घोडवैद्य यांनी केले आहे. प्रस्तुत संगीत कट्यार काळजात घुसली…. एक अनुभूती या नाटकाच्या प्रयोगाला जातीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनोहरभाई पटेल अकॅडमी चे सचिव श्री राजेंद्र जैन यांनी केले आहे.