Tuesday, September 17, 2024
Google search engine
HomeUncategorizedसे.नि.मुख्याध्यापकांचा सत्कार;शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

से.नि.मुख्याध्यापकांचा सत्कार;शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

गोंदिया : विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून,नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या प्राचार्य/मुख्याध्यापकांचा सत्कार करून माध्यमिक शिक्षण विभाग जि.प.गोंदियाच्या वतिने नविन पायंडा पाडला.यामूळे शिक्षण क्षेत्रात शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सत्कार कार्यक्रमाचे आयोजन पी.पी.काॅलेज ऑफ एज्युकेशन गोंदिया येथे,संवाद गुणवत्तेचा या कार्यशाळेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख होते.
या प्रसंगी विचारमंचावर उपशिक्षणाधिकारी श्री.दिघोरे, गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे, कु.पुसाम,गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले व सर्व सत्कार मुर्ती उपस्थित होते.
या प्रसंगी संत कबीर हायस्कूल शिवनीचे मुख्याध्यापक रमेश तणवाणी, जीईएस हायस्कूल पांढराबोडीचे मुख्याध्यापक भागिरथ जिवानी, आदिवासी विकास हायस्कूल खजरीचे मुख्याध्यापक खुशाल कटरे, जे.एम.हायस्कूल गोंदियाचे मो.जी.डी.शफीउल्ला, श्री.समर्थ हायस्कूल तिगांवच्या मुख्याध्यापिका स्नेहा कावळे, जी.ई.एस.हायस्कूल दासगांवचे मुख्याध्यापक एच.डी.पटले, आदिवासी विकास राजश्री हायस्कूल कडीकस्साचे मुख्याध्यापक व्हि.आर.खराबे, जीईएस हायस्कूल कवलेवाडाचे एल.जी.शहारे, निशांत हायस्कूल शिवनीचे मुख्याध्यापक बी.टी.काशीवार, जिवनज्योती हायस्कूल कातूर्लीचे मुख्याध्यापक एम.के.डोंगरवार,शाम माध्यमिक विद्यालय निंबगावचे मुख्याध्यापक ओमप्रकाशसिंग पवार यांचा सत्कार करण्यात आला. संचालन गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह ओमप्रकाशसिंग पवार व आभार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्विते साठी सुरेश रहांगडाले ,श्री.रोकडे यांनी परीश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments