Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorized३ कोटी ३२ लक्ष ९० हजार निधीच्या विकास कामाचे आमदार कोरोटे यांच्या...

३ कोटी ३२ लक्ष ९० हजार निधीच्या विकास कामाचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत डोंगरगाव-ओवारा-चांदलमेटा ४ कि.मी.आणि एन.एच.६-धोबीसराड-गोटाबोडी ४कि.मी.अंतराचे सिमेंट कांक्रेट व डांबरीकरण रस्ता बांधकाम मंजूर
गोंंदिया : आमदार सहषराम कोरोटे यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे एकूण ३ कोटी ३२ लक्ष ९० हजार रूपय निधीचे देवरी तालुक्यातील डोंगरगावं-ओवारा-चांदलमेटा (रक्कम-१ कोटी ६४ लक्ष २० हजार) व एन.एच.६- धोबीसराड-गोटाबोडी(रक्कम -१ कोटी ६८लक्ष ७० हजार) या मार्गावरील सिमेंट कांक्रेट व डांबरीकरण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आज शुक्रवार (ता.०२ फेब्रवारी) रोजी आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी तालुका कांग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया, जि.प.सदस्य उषाताई शहारे, पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे, गोटबोडीचे सरपंच मनोहर राऊत,माजी जि.प.सदस्य राजूभाऊ चांदेवार, ओवाराचे सरपंच भाऊराव येरणे, उपसरपंच शिवाजी पुसाम, उपविभागीय अभियंता कापगते साहेब, कांग्रेस चे कार्यकर्ता जागेश्वर कोल्हारे, अविनाश टेंभरे, कुलदीप गुप्ता,वरिष्ठ कांग्रेस कार्यकर्ता बळीराम कोटवार,सामाजिक कार्यकर्ता नितेश वालोदे, सचिन मेळे, हण्णू किरसान, सुंदरलाल बन्सोड, माजी सरपंच तथा ग्रा.पं.सदस्य वनचलाताई कुरसुंगे, ग्रा.पं.सदस्य टिकेशजी राऊत, मयुरीताई अमृतकर, विनोद डिब्बे,महेश चवटे,अप्सराताई डोंगरवार,गेंदलाल राऊत, ग्रामविस्तार अधिकारी किशोर आचले, कैलाश घासले, नरेश राऊत, छगनलाल मुंगणकर, लालचंद सराटे, राधेशाम राऊत, ग्रा.पं.सदस्य ललित मेश्राम, रेवणकलाताई मोटघरे, अमोल येरणे, जितू सराटे आणि गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments