अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या लापरवाहीमुळे वडिल व चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

0
500

अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या विरोधात जनतेचा 4 तास रस्ता रोको आंदोलन
गोंदिया : महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम बामणी खडकी जवळ सिंगल साईड रोड सुरू असल्यामुळे तीन दिवसांमध्ये हा तिसरा अपघात आहे. अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व सेफ्टीच्या लापरवाहीमुळे दिवस रात्र सिंगल रस्ता सुरू ठेवून आणखी किती लोकांचा जीव घेणार असा प्रश्न जनतेसमोर उभा आहे. 14 फेब्रुवारीच्या रात्रीला 7.30 ते 8 वाजताच्या दरम्यान देवजीटोला जवळील पुलाजवळ कोहमाराकडून देवरीला मोटरसायकलने वडील आणि मुलगी जात होती. सिंगल रोड सुरू असल्यामुळे व रोड खोदून ठेवल्यामुळे मोटरसायकल चालकांना कमलीचा त्रास होतो. देवरीच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स भर वेगात होती. दरम्यान ट्रॅव्हल्सने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत वडील सूरजलाल वासाके (33) व सात वर्षीय चिमुकली वेदिका वासाके चा दुर्दैवी मृत्यू झाला.
ब्राह्मणी खडकी येथील व परिसरातील जनतेने चार तास रस्ता बंद करून ठेवला. प्रशासनाला जनतेने विनंती केली की तुम्ही अग्रवाल कंपनीच्या लोकांना बोलवा किंवा अश्व कंपनीच्या लोकांना बोलवा, पोलीस प्रशासन यांनी अग्रवाल कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना बोलविला नाही. तीन दिवसांमध्ये या परिसरात हे तिसरी घटना घडली आहे. पण प्रशासन कोणतीही कारवाई करत का नाही, असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. परिसरातील जनतेने व ब्राह्मणी खडकी येथील तरुण मंडळींनी अग्रवाल कंपनी, अशोका कंपनी व पोलीस प्रशासन यांना विनंती केली आहे कि येणाऱ्या सात दिवसात खोदलेला रोड दुरुस्त न झाल्यास खूप मोठा रस्ता रोको आंदोलन करू अशी धमकी दिली आहे.
जनतेने पोलिस प्रशासनासमोर अग्रवाल कंपनीचे लोकांना बोलवा तेव्हाच मृतदेह उचलू देऊ असा हट्ट धर चार तास रस्ता अडवून ठेवला. माहितीप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून जनतेला समजूत घालून त्वरित अग्रवाल कंपनीने बंद केलेला रोड सुरू करून दोन्ही लाईन महामार्ग सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here