Saturday, September 7, 2024
Google search engine
HomeUncategorizedअर्जुनी मोरगावचा आठवडी बाजार चिखलात !

अर्जुनी मोरगावचा आठवडी बाजार चिखलात !

नगरपंचायत निद्रावस्थेत : मूलभूत सुविधांचा अभाव

गोंंदिया : सतत या ना त्या कारणावरून चर्चेत राहणारी अर्जुनी नगरपंचायत रोज नवे विक्रम करीत आहे. नगरपंचायत आणि तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या अर्जुनी येथे आठवडी बाजाराची वाणवा आहे.येथे भरणारा आठवडी बाजार चिखलाच्या साम्राज्यात भरीत आहे.शहरासारख्या ठिकाणी आठवडी बाजार चिखलात भरतो ही बाब लाजिरवाणी आहे.केवळ कमिशन खोरीच्या नादात असणारे पदाधिकारी आणि अधिकारी यांना काही सोयर सुतक नाही.
अर्जुनी नगरामध्ये अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. 2015 ला ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले.नगरपंचायतचा थेट राज्य शासनाची संपर्क येतो.भरपूर प्रमाणात नगरपंचायतींना निधी मिळतो.तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेले अर्जुनी शहर विकासाच्या प्रतीक्षेत होते.नगरपंचायत झाल्याने शहराचा कायापालट होईल अशी आशा नागरिकांना होती.आठ वर्षे लोटली मात्र नागरिकांचा भ्रमनिरास सुरू आहे.सतत चर्चेत राहणारी नगरपंचायत सध्या बाजार वाडीतील चिखलाच्या साम्राज्याने चर्चेचा विषय बनली आहे.शहराचा विकासात्मक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून नागरिकांना उत्तम सुविधा देणे नगरपंचायतचे कर्तव्य आहे.मात्र शनिवारला भरणारा आठवडी बाजार मूलभूत सुविधांच्या अभावी भरवीला जातो.शहराच्या मध्यभागी बाजारवाडीची नियोजित जागा उपलब्ध आहे.मात्र नियोजित जागेवर धनदांडग्याणी कायमस्वरूपी अतिक्रमण करून बाजार वाडीची जागा घशात घातली आहे. नगरपंचायतच्या मालकीची जागा असूनही महसूल विभागाच्या हेलिपॅड मैदानावर बाजार भरविला जातो.पावसाळ्यात या मैदानावर चिखलाचे साम्राज्य आहे.नागरिकांना चिखलातून मार्ग काढीत खरेदी करावी लागते.चिखलात घसरून पडण्याची भीती ग्राहकांना असते. मजबुरी पोटी दुकानदार आणि ग्राहक नगरपंचायतच्या गलथान कारभाराचा मुका मार सहन करीत आहेत.या परिसरात चिखलासह घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बाजारवाडीचे ठिकाणी स्वच्छतागृह,पिण्याचे पाणी आणि पथदिव्यांचा अभाव आहे.नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते.बाजार लिलाव करून मोकळे होणे एवढीच जबाबदारी नगरपंचायत बजावत आहे.नगरपंचायतींना शासनाकडून भरपूर निधी मिळते असा नागरिकांचा समज आहे.
शेवटी नाव सोनाबाई हाती कथिलाचा वाडा म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यासंबंधाने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व आठवडी बाजार ठेकेदार यांचेशी चर्चा केली .
*लवकरच सुविधा उपलब्ध करू-बारसागडे नगराध्यक्षा*
नगरपंचायत आठवडी बाजार भरत असलेल्या ठिकाणी योग्य सोयी सुविधा पुरविन्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.परंतु पावसामुळे त्या ठिकाणी चिखल साफ करून काळी गिट्टी, चूरी पसरविन्याचे कार्य अमलात आनता आले नाही. मात्र पुढील आठवडी बाजार स्वच्छ व प्रकाशीत व सुविधा पूर्ण पद्धतीने भरविला जाईल. नियमित मुख्याधिकारी नसल्याने काही समस्या निर्माण झाली.नागरिकांना योग्य सुविधा पुरविन्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत.

*समस्या मार्गी लावू-तांबे*
या नगरपंचायतचा प्रभार नुकताच माझ्याकडे आला. यात आठवडी बाजार ठिकाणी चिखल होत असल्याची बाब समोर आली.नगराध्यक्ष यांचे सम्मतीने सुधारणा करण्याचे ठरले.मात्र तांत्रिक समस्यमुळे शक्य झाले नाही. दोन दिवसात सुधारणा होईल.प्रभारी मुख्याधिकारी प्रणय तांबे

*नगरपंचायत जबाबदारी टाळटण्याचा परिणाम-लाडे*
पावसाळ्यापूर्वी सुविधांची पूर्तता करण्यात यावी यासाठी दोन महिने आधी नगरपंचायतीच्या वतीने लिलाव करून त्या पैशाने योग्य सोयी सुविधा पुरविण्याचे ठरविण्यात आले.परंतु अजूनही सुविधांची पूर्तता न केल्यामुळे दुकानदार व नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारवाडीच्या सुविधा पूर्ण का करता आल्या नाही.यासाठी नगरपंचायत जबाबदार आहे-बादल लाडे ठेकेदार,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments