पोंगेझरा येथे दोन सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

0
305

घराजवळून वाहणाऱ्या नालाच्या पुलावर खेळत असताना वाहून गेल्याने झाला मृत्यू
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा हिरडामाली येथे घरा शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना वाहून गेल्याने दोन चिमुकल्या सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. हिरडामाली येथे पोंगेझरा देवस्थानाच्या बाजूला एक नाला वाहतो. त्या नाल्यावर पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र पुलाची उंची आणि 2 फूट पानी वाहत होते कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी पाहतो. देवस्थानात राहणारे पुजारी सुजित दुबे यांचे दोघे चिमुकले काल सायंकाळी खेळता खेळता या पुलावर पोहोचले. पाण्यात खेळण्याचा मोह चिमुकल्यांना आवरला नाही. यातच पुलाच्या मध्यभागी पाण्यात खेळता खेळता चिमुकल्यांचा पाय घसरल्याने दोघेही चिमुकले पाण्यात वाहून गेले. रुद्र सुजित दुबे (३) व शिवम सुजित दुबे (२) दोन्ही राहणार पोंगेझरा हिरडामाली अशी मृतकांची नावे आहेत. काल रात्री गोरेगाव पोलिसात या संदर्भात वडील सुजित दुबे यांनी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केल्यानंतरही दोघे चिमुकले सापडले नाही. आज शोधकार्या सुरू असताना दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पोंगेझरा हिरडामालीच्या जवळ असलेल्या नाल्यात तरंगताना आढळले. घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here