अवैध रेती वाहतूक करताना ट्रक पकडला, 35.54 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
341

गोंदिया : पोलीस अधीक्षक गोरख भामरे गोंदिया, नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग देवरी यांच्या मार्गदर्शनात पर राज्यातील अवैध रेती वाहतुकीवर आळा बसविन्यासाठी कायदेशीर कारवाही करन्याचे आदेस दिले आहे. त्याच आधाराव छत्तीसगढ़ राज्यातुन निर्धास्तपणे गोंदिया जिल्हाच्या देवरी हददीमधुन रेतीचे वाहने चालविले जात असल्याने ते गैरकायदेशीर असुन त्यावर प्रतिबंध करणे अत्यावश्यक असल्याने शिरपुर चेक पोस्टसमोरील चौकात नाकाबंदी लावण्यात आली.
ज्यात २० जानेवारी २०२५ रोजी राजनांदगाव (छ.ग.) कडुन देवरी मार्गे नागपुरकडे जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र. एन.एच.५३ रोडनी एक टाटा कंपनीचा ट्रक क्र. एम.एच. ३० बी.टी.६५७५ यास थांबवुन ट्रकची पोलिसानीं तपासनी केली असता त्यात रेती भरुन आढळली. पोलिसांनी चालकास रेती (वाळ) बाबत परवाणा विचारला असता कुठलाही परवाणा न बाळगता वाहन चालक नामे आशिष देवराव वानखेडे, वय २७ वर्ष, रा. पिप्री. ता. आकोट, जि. अकोला व वाहन मालक नामे अमय अतृलराव म्हैसने, वय २९ वर्ष,रा. गजानन नगर आकोट, ता. अकोट, जि. अकोला रेती वाहतुक करीत होते. वाहन चालक वाहन क्र.एम.एच. ३० बी.टी. ६५७५ कि. ३५,००,०००/रु. मध्ये अवैधरित्या ०९ ब्रास रेती किंमती ५४,००० /रु. असा एकुन किमती ३५,५४,०০০/रु चा माल पर्यावरणाचा -हास होईल अशा पध्दतीने रेती घाटातुन उपसा करुन चोरीने वाहतुक करतांनी मिळुन आले. ज्यामुळे वाहन चालक व वाहन मालक योचे विरुध्द कलम ३०३(२), ४९ बीएनएस सहकलम ७, ९ पर्यावरण सरक्षण अधि. अन्वये देवरी पोलिस्टेसनला गुन्हा नोद करण्यात आला आहे. गुन्हयाचा पूढील तपास प्रविण डागे पोलीस निरीक्षक देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. मानीक पुरी पोलिस्टेसन देवरी हे करीत आहेत. सदर कार्यवाही करतेवेळी पो. हवा.बोपचे, पो.ना. कांदे, पो.शि. इंगळे हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here