Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedउत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा होणार सत्कार, ग्रामपंचायतींना मुकाअ एम. मुरूगानंथम यांचे निर्देश

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा होणार सत्कार, ग्रामपंचायतींना मुकाअ एम. मुरूगानंथम यांचे निर्देश

जागतिक महिला दिनी पाणी स्वच्छता विभागाच्या उपक्रम
गोंदिया : पाणी व स्वच्छतेबाबत गावात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमीत्त सत्कार करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना देण्यात आले असून सर्व ग्रामपंचायतींनी महिलांचा यथोचित सन्मान करण्याचे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. एम. मुरूगानंथम यांनी केले आहे.
येत्या शनिवारी संपूर्ण देशात जागतिक महिला दिन सजरा करण्यात येत आहे. त्यानिमीत्त पाणी व स्वच्छता विभाग, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचे शासनाने निर्देश दिले आहेत.
त्यानुसार सर्व ग्रामपंचायतीमध्ये अमलबजावणी सहाय्य संस्था म्हणून निवड झालेले ग्राम संघातील सर्व महिलांची जागतिक महिला दिनानिमित्य महिलांची विशेष धाव (वॉश रन ) आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महिला, बचत गटातील उमेद, किशोरवयीन मुली / विद्यार्थीनी,स्वच्छता कर्मचारी,पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य आणि समुदयातील प्रभावशाली लोकांचा समावेश करून पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
यासह ८ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष महिला सभेचे आयोजन करावयाचे आहे.‌ सभेत पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान सद्यस्थितीत येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा, कथा कथन सत्र, पथनाट्य, मासिक पाळी व्यवस्थापन, Ftk किट चाचणी करावयाची आहे. तालुकास्तरावर सत्कार सोहळा आयोजित करणे, ग्रामस्तरावर पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वच्छता कामगार महिला, स्वच्छतेच्या मालमत्तेचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती संबंधित सुयोग्य व्यवस्थापन करणारे महिला नेतृत्व, किशोरवयीन चॅम्पियन, क्षेत्रीय तपासणी संचाच्या सहाय्याने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण करणाऱ्या महिलांचा तालुकास्तरावर सत्कार सोहळा आयोजित करावयाचा असल्याची माहिती पाणी व स्वच्छाता विभागाचे उपमुख्य कार्यकारी आनंदराव पिंगळे यांनी दिली.

विशेष सत्कार
पाणी व स्वच्छतेचे व्यवस्थापन करणारे स्वयंसेवी गट, नेते, किशोरवयीन चॅम्पियन, पाणी गुणवत्ता बाबत देखभाल दुरुस्त करणाऱ्या महिला (एफटीके किट वापरून) आणि वॉशच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व महिलांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

प्रचार व्हावा
महिलांच्या कार्याला अधिक वाव देण्यासाठी समाज माध्यमांच्या वापरावर शासनाचा भर आहे. उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिलांच्या प्रेरणादायी कथा तयार करणे तथा अशा कथांना समाज माध्यमातून व्यापक प्रसिद्धीचे शासनाचे निर्देश आहेत.

असे होणार उपक्रम
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वॉश रन चे आयोजन करणे. महिलांचा सन्मान, ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन, जिल्ह्यात किमान एक महिला अनुकूल आदर्श ग्रामपंचायती संबंधित मॉडेलची उभारणी करणे, स्थानिक महिला नेतृत्वासोबत गट चर्चा किंवा कथाकथन सत्रे आयोजित करणे. पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रातील महिलांच्या भूमिकेविषयी पथनाट्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे. मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन तसेच एफटीके किट चाचणी आणि इतर वॉश संबधी नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे. तथा स्वयं सहाय्य बचत गटाच्या या नेतृत्वाखालील पाणी व स्वच्छता क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रदर्शन करणारे मेळावे आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments