Saturday, July 19, 2025
Google search engine
HomeUncategorizedकासा-काटी पुरग्रस्त गावातील अकरा गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे हलविले

कासा-काटी पुरग्रस्त गावातील अकरा गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे हलविले

गोंदिया : जिल्ह्यात 7 व 8 जुलै पासुनच्या सततधार पावसामुळे सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे. गोंदिया तालुक्यातील कासा-काटी मार्ग वैनगंगा नदी व बाघ मार्ग नदी पुरामुळे बंद झाले होते.सदर पुरग्रस्त गावातील गरोदर मातांना प्रसूती संबंधाने आरोग्याची निकड व गुंतागुंत न होण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने त्या कार्यक्षेत्रातील अकरा गरोदर मातांना वेळीच प्रसंगावधाने ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अँबुलंन्स वाहनाने हलविलेची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र काटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम गौतम यांनी दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र काटी अंतर्गत उपकेंद्र कासा कार्यक्षेत्रातील पुजारीटोला येथील महिमा पाचे,नेहा कावरे,नमिता चौधरी व उमिता माने तर ब्राम्हणटोला येथील सरिता जमरे,अश्विनी चौधरी,हेमलता मरठे व ज्ञानेश्वरी खरे तसेच कासा येथील सुषमा चौधरी,सुलोचना चौधरी व आरती पाचे असे एकुण अकरा गरोदर मातांना त्यांची अपेक्षित प्रसूतीची तारीख जवळ असताना गुंतागुंत होऊ नये म्हणून तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे भरती करुन मोलाची कामगिरी केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी मुळे लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उदभवु नये म्हणुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचार्यांना मुख्यालयी राहुन नदीकाठच्या गांवावर विशेष लक्ष देण्याचे आदेश पारी केले आहेत.त्या अनुषंगाने आरोग्य प्रशासनामार्फत नदी काठच्या गावातील नजीकच्या प्रसुती होणार्या गरोदर माता व लहान बालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत असुन त्यांची प्रसुती सुखरुप होण्याच्या दृष्टीकोनातुन जवळच्या आरोग्य संस्थेत भरती करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.आरोग्य सेविका,समुदाय आरोग्य अधिकारी,आशा सेविका व वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत गरोदर मांताच्या संपर्कात राहुन त्यांच्या प्रकृतीबद्दल माहीती घेत आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी सर्व ग्रामीण रुग्णालय यांना अ‍ॅलर्ट देवुन पुरग्रस्त भागातील लोकांना तात्काळ भरती करुन आरोग्य सेवा देण्याचे निर्देश वैद्यकिय अधिक्षक यांना दिले आहे. 8 जुलै रोजी गोंदिया तालुक्यातील कासा-काटी अतिवृष्टी पुरग्रस्त गावामध्ये आरोग्य प्रशासनाच्या आरोग्य चमुमध्ये गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,प्राथमिक आरोग्य अधिकारी काटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम गौतम,भानपुर वैद्यकीय अधिकारी डॉ.अमर खोब्रागडे,वाहन चालक चौधरी,कासा उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी शिवानी सोनवाने,आरोग्य सेविका सुनिता दंधारे,स्टाफ नर्स यादव,आशा सेविका अंजीरा खैरवार,किरण चौधरी व सुनिता जमरे यांनी विशेष तत्परतेने सर्व अकरा गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालय रजेंगांव येथे पुर परिस्थिती मुळे आरोग्य निकड म्हूणन भरती केले.ग्रामीण रुग्णालय रजेंगांवचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.माहुर्ले यांनी या प्रसंगी सर्व अकराही गरोदर मातांना भरती करुन आरोग्य सेवा प्रदान करित आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments