खासदार प्रफुल्ल पटेलांनी जाणून घेतल्या कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी व प्रलंबित समस्या

0
213

गोंदिया : आज खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी गोंदिया स्थित निवासस्थानी जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर संवाद व चर्चा केली तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पक्ष संघटन यावर संवाद साधला. कार्यकर्त्यांकडून आलेले निवेदन स्वीकारून त्याच्या अडी – अडचणी व प्रलंबित समस्या जाणून घेत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन व पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया व तिरोडा तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून श्री अरुण नागोजी गजभिये, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती गोंदिया, गोंदिया शहर श्री रुपेश विजयकुमार नशिने, श्री सचिन अवस्थी, श्री सब्बू अग्रवाल, श्री अभय अग्रवाल, श्री प्रकाश जगतराम, रजनीताई कुंभारे सरपंच सीतेपार, श्री दिलदार रंगारी सामाजिक कार्यकर्ते सीतेपार तालुका तिरोडा यांचा पक्षात प्रवेश करण्यात आला. गोंदिया तालुका ग्राम बनाथर येथील श्री धनंजय गुप्ता, श्री अशोक बरवे, श्री दिनेश दवणे, श्री हनस बरवे, श्री कुमार बिसेन यांची पक्षात घर वापसी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here