Sunday, September 8, 2024
Google search engine
HomeUncategorizedगर्भवतींनो मधुमेह तपासणी करा : भावना कदम

गर्भवतींनो मधुमेह तपासणी करा : भावना कदम

गोंदिया. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम मार्फत स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन निमित्ताने मोफत रक्त शर्करा चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन माजी सभापती भावनाताई कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या कॅम्प च्या संयोजिका वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर, रक्त तपासणी अधिकारी श्रीमती किरणापुरे,
सार्वजनिक आरोग्य अधिपरिचरिका अर्चना वासनिक, आधार संघटना उपाध्यक्ष लता ताई बाजपाई, बाह्य रुग्ण विभाग अधिपरिचरिका नीलम शुक्ल, आहार तज्ञा कोमल अवस्थी, स्वाती बन्सोड आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
जागतिक मधुमेह दिन बाबत प्रास्ताविक माहिती समुपदेशिका नितु फुले यांनी दिली या वेळी कॅम्प च्या उद्घघटिका माजी सभापती सौ भावनाताई कदम यांनी आवाहन केले की गर्भवतींनो रक्त शर्करा तपासणी अवश्य करा कारण आजकाल मधुमेह मुळे हायरिस्क गर्भवतीच्या जीविताला धोका निर्माण होते त्यामुळे गंगाबाई महिला रुग्णालयात मोफत मधुमेह स्क्रिनिंग तपासणी सुविधा उपलब्ध आहे त्याचा लाभ घेतला पाहिजे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक मधुमेह दिन निमित्ताने आयोजित या कॅम्प च्या संयोजिका डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले की मधुमेह हा एक सायलेंट किलर आजार आहे. त्यामुळे
लक्षणे दिसताच रक्त शर्करा तपासणी करून घ्यावी गर्भवतीने वैद्यकीय तपासणी करताना ओरल जी टी टी ग्लुकोस टोलेरन्स तपासणी अवश्य करावी कारण वाढलेली शुगर गर्भस्थ शिशु वर प्रतिकूल परिणाम करते व गर्भवती चे बाळंतपण सुद्धा अवघड करून ठेवते, त्यामुळे एएनसी क्लीनिकला शुगर तपासणी अनिवार्य करावी बाई गंगाबाई महिला रुग्णालयात प्रसूतीतज्ञा कडून मोफत तपासणी व उपचार केले जातात त्याचा लाभ घेतला पाहिजे.
या वेळी आहारतज्ज्ञ कोमल अवस्थी यांनी गर्भवतीने गर्भावस्थेत संतुलित आहार घेऊन शुगर कशी कंट्रोल ठेवावी याचे मार्गदर्शन केले स्वाती बन्सोड यांनी शुगर कंट्रोल साठी आहार व कडधान्य मिलेट कशे उपयोगी आहेत याची सचित्र माहिती दिली.
बाह्य रुग्ण विभाग प्रभारी अधिपरिचरिका नीलम शुक्ला यांनी आवाहन केले की अति जोखमीच्या गर्भवतीने नियमित आरोग्य तपासणी करावी व डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे काही धोक्याची लक्षणे आढळून आली तर जवळच्या
आरोग्य केंद्रात संपर्क करावा.
या वेळी जागतिक मधुमेह दिन निमित्ताने आरोग्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती त्याचा लाभ उपस्थित रुग्ण व नातेवाईक यांनी घेतला .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments