गोंदिया : गृह विभागाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागातील पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि. ७) बदल्या केल्या आहेत. त्यात गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे, त्यांच्या जागेवर नागपूर शहरचे उपायुक्त गोरख भामरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संबंधितचे आदेश बुधवारी काढण्यात आले आहे.
निखिल पिंगळे हे दीड वर्षांपूर्वी रुजू झाले होते. या कालावधीत त्यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आरोपींना तडीपार करणे, एमपीडीएची कारवाई करणे, नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, गुन्हेगारांना न्यायालयातून शिक्षा करण्यासाठी उत्कृष्ट तपासाच्या टिप्स कर्मचाऱ्यांना देणे, पारदर्शक पोलिस भरती, तसेच लोकसभा निवडणुका सुद्धा सुरळीत पार पाडल्या. गेल्या दीड वर्षात पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून छाप पाडली होती. आता त्यांची पुणे शहर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
गोंदियाचे नवे पोलिस अधीक्षक गोरख भामरे
RELATED ARTICLES