वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, बोदरा-देऊळगाव जंगलातील घटना

0
254

गोंदिया : अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्‍या बोदरा देऊळगाव येथील कक्ष क्रमांक 307 राखीव जंगलात पट्टेदार वाघाने गायीची शिकार केली. ही घटना मंगळवार, 6 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. निमगाव येथील मनोहर झिंगाजी चचाने यांची गाय बोदरा देऊळगाव जंगलात चरण्यासाठी गेली होती. दरम्यान दबा घेऊन बसलेल्या पट्टेदार वाघाने गायीवर हल्ला करुन ठार केले. यात मनोहर चचाणे यांचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेनंतर वनविभागाने चचाणे यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान घटनेचा पंचनामा वन परिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक भोगे मैडम व वनरक्षक माधुरी लुचे यांनी केला आहे. तसेच बोदरा देऊळगावच्या कक्ष क्रमांक 307 राखीव जंगलात वन्यप्राणी पट्टेदार वाघ वास्तव्यास असल्याने जंगलामध्ये नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here