गोंदिया : जिल्हात दुधात होणा-या भेसळीविरूध्द कारवाई करण्यासाठी दि ०२/०६/२०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हानिहाय धडक मोहीम राबविण्याचे निर्देश शासन निर्णय दि. २८/०६/२०२३ अन्वये दिले आहेत. ही मोहीम सर्व जिल्हयांत सुरू करण्यात आली आहे. राज्यात दुध भेसळ रोखण्याच्या अनुषगाने २८ जून रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार दुधात होणा-या भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे जिल्हयाचे मा. अपर जिल्हाधिकारी हे आहेत. मा. अपर पोलिस अधीक्षक, मा. सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, मा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, मा. उपनियंत्रक वैध मापनशास्त्र यांची सदस्य तर मा. जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निर्णयाची अंमलबजावणी राज्यभरात करण्याच्या अनुषगाने सदर शासन निर्णयानुसार, मा प्रधान सचीव, अनुप कुमार यानीही दि १३/०३/२०२५ रोजी धडक मोहीमा राबविण्याचे असे आदेशीत केले आहे. त्यानुसार गोंदिया येथे दि ०२/०६/२०२५ रोजी समीतीची आढावा बैठक आयोजीत करण्यात आलेली होती. सदर समीतीचे अध्यक्ष गोंदिया जिल्हयाचे मा. अप्पर जिल्हाधिकारी यांनी सदर समीती सदस्य यांना दुधात भेसळ करना-यांविरूध्द कडक कार्यवाही करन्याचे व तात्काळ गुन्हा नोदवीन्याची कार्यवाही करण्यात यावी, तसेच गोंदिया जील्हयातील सर्व तालुक्यांमध्ये धडक भेसळ तपासनी करण्यात येवून दुध विक्री व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन करना-या संस्थ/आस्थापना यांची यादी उपलब्ध करून तसेच हॉटेल्स येथे भेटी देवुन पनीर, दही, इत्यादी दुग्धजन्य पदार्थ तपासावेत असे आदेश भेसळ विरोधी समीती सदस्यांना दिले आहेत.
त्यानुसार १९.०६.२०२५ रोजी मा अप्पर जिल्हाधिकारी श्री मिनाज मुल्ला सर यांच्या सोबत सर्व भेसळ विरोधी समिती सदस्य यांनी गोंदिया येथील दुध खरेदी व विक्री करणा-या दुकान/आस्थापना येथे अचानक तपासणी केली. यावेळी तुलसी दुध डेअरी, पत्ता-गोरक्षन मार्केट जवळ, गोंदीया येथे वजन काटा प्रमाणित न आढळल्याने वैधमापन शास्त्र अधीनीयम अंतर्गत गुन्हा नोंद करन्यात आला, व अन्न व औषध प्रशासना मार्फत कमी प्रतीचे आढळलेल्या दुधाचा नमुणा तपासणीस पाठविण्यात आला.
महालक्ष्मी दुध डेअरी, पत्ता- बीरसी गॅरेज पाठीमागे, गोंदीया येथे भेट देवून तपासणी केली असता सदर आस्थापनेकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आढळुन आला नाही. तसेच नगरपरिषद यांचा व्यवसाय परवाना न आढळल्याने तात्काळ नगर परीषद परवाना विभागामार्फत नियमाअंतर्गत कार्यवाही सुरु करण्यात आली. सदर महालक्ष्मी दुध डेअरीमध्ये काही प्रमाणात बुरशी युक्त, खाण्यास अयोग्य मिठाई आढळल्याने समिती मार्फत नियमांतर्गत कार्यवाही करत सदर मिठाई समिती सदस्यांसमोर नष्ट करण्यात आली. वजन काटा प्रमाणित न आढळल्याने वैधमापन शास्त्र अधीनीयम अंतर्गत गुन्हा नोंद करन्यात आला, व अन्न व औषध प्रशासनामार्फत भेसळ तपासणीकरीता नमुणे घेवून तपासणी करीता पाठविण्यात आले.
गोंदियात जिल्हयातील सर्व दूध विक्रेता, दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक यांनी उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहीत दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी, तसेच गोंदिया जिल्हयातील नागरीकांना दुध व दुग्धजन्य पदार्थात भेसळी बाबत तक्रार करावयाची असल्यास मा. अपर जिल्हाधिकारी कार्यालय व दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दुध योजना कार्यालय गोंदिया यांना कळवावे असे आवाहन दुध भेसळ विरोधी समीतीचे अध्यक्ष मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री मिनाज मुल्ला सर यांचे मार्फत करण्यात आले आहे.