माजी मंत्री, आमदार राजकुमार बडोले यांची पूर्व केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा

0
211
गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेलजी यांची मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. चर्चे मधे रोजगार निर्मिती, क्षेत्रातील सिंचन योजना, पर्यटन विकास व शेतकर्यांना किमान बारा तास दिवसा वीज मिळावी इत्यादी महत्वाच्या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली असून लवकरच याबाबत आपण सरकार सोबत चर्चा करून संयुक्त बैठक घेऊन विषय मार्गी लावू असे आश्वासन प्रफुल पटेल यांनी राजकुमार बडोले यांना दिले. माननीय प्रफुलभाई पटेलजी यांच्या विकासात्मक कार्यशैलीचा गोंदिया जिल्हा आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला लाभ होत आला असुन पुढे देखील ही वाटचाल सुरू राहील असा ठाम विश्वास राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here