गोंदिया : ‘योग’ एक असा प्रकाश किरण आहे. ज्याचा तेज कधीही मावळत नाही, त्याचा जितका सराव कराल, तो तितका तेजस्वी होत जाईल. म्हणून प्रत्येक नागरिकांनी रोजच्या जिवनात नियमितपणे दैनंदिन कार्य करण्यासाठी योग केला पाहिजे. असे प्रतिपादन समशेर पठाण तहसिलदार गोंदिया यांनी 21 जून 2025 हया 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. पुढे ते म्हणाले, तनावमुक्त वातावरणाची निर्मिती करून ‘स्वस्थ जीवन जगणे हे जीवनाचे भांडवल आहे. तरी आपले शरीर आणि मन निरोगी ठेवून संस्कतिचा वारसा पुढे न्यावा व योगाचा प्रचार व प्रसार करावा असे आव्हान त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात ए. बी. मरसकोले, जिल्हा कीडा अधिकारी यांनी योगाचा उद्देश व महत्व स्पष्ट करतांना सांगितले की, आयोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली असून बळकट व सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करण्याचा उपक्रम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 ची थीम “योग फार वन अर्थ, वन हेल्थ” अर्थात एक पृथ्वी, एक स्वास्थ असल्याचे सांगितले. सर्वप्रथम प्रमुख अतिथीच्या हस्ते दिप प्रज्वलीत करण्यात आले व तद्भतर प्रमुख पाहुण्यांचे सन्मानचिन्ह देवुन स्वागत करण्यात आले.
कीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा कीडा परिषद, शिक्षण विभाग, मेरा युवा भारत, भारत स्काऊट गाईड, अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ, जनशिक्षण संस्थान, इंटरनॅश्नल नैच्युरोपॅथी ऑरगनायझेसन, सुर्या फाऊंडेशन व जिल्हयातील विविध योग व क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जुन 2025 हा दिवस अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणुन जिल्हा कीडा संकुल मरारटोली गोंदिया येथे आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन एन जी डाहाके, शिक्षण विस्तार अधिकारी गोंदिया, चेतना ब्राम्हणकर, जिल्हा संघटक गोंदिया भारत स्कॉउट्स गाईड, अशोक बरईकर शिक्षण विस्तार अधिकारी तिरोडा, विनायक डोंगरवार, संचालक जनशिक्षण संस्थान, सतिश पारधी पत्रकार, नितीन गजभिये जिल्हा संघटक महाराष्ट्र व्यसन मुक्ती विकास संस्था, शशांक कोसरकर सचिव गोंदिया जिल्हा योग संघटना, सारिका बरईकर, केशव मेश्राम प्रकल्प अधिकारी जनशिक्षण संस्था, सुधा पाठक, विशाल ठाकूर, अंकुश गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी योग क्षेत्रात विशेष कामगीरी करणा-या योगपटूंचा सत्कार करण्यात आले स्युहा बडोले, विहान गजभिये, संचित रामटेके, युगांश बनसोड, तनशुक सिल्हारे, ओनस्वी परमार, अथर्व परमार, व माधुरी परमार योग व निसर्गपोचार तज्ञ यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाअंतर्गत योग प्रशिक्षिका माधुरी वानकर (परमार) यांनी कॉमन प्रोटोकालनुसार योगाचे विविध प्रकारातील प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सदर कार्यक्रमात सरासरी 250 योगपट्ट सहभागी झालेले होते. कार्यक्रमाचे संचालक अंकुश गजभिये यांनी तर आभार केशव मेश्राम, यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता रविंद्र वाळके, रितेश पाकमोडे, नरेंद्र कोचे, मोहन चौरसिया, ऋतृराज यादव, किसन गावड, निकीता बोरकर, अनिल बागडे यांनी अथक प्रयत्न केले. शेवटी सर्व योगपटूंना बिस्कीट वितरण करण्यात आले. व कार्यकमाची सांगता करण्यात आली.