Sunday, September 8, 2024
Google search engine
HomeUncategorizedवनहक्कधारकाच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस, दोघांची प्रकृती खालावली

वनहक्कधारकाच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस, दोघांची प्रकृती खालावली

गोंदिया : वन हक्क धारकांचे (अन्नत्याग) आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस असून उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. मात्र वनविभागाच्यावतीने अद्यापही या आंदोलनाची दखल व योग्य निर्णय न लागल्याने आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे यांनी उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आत्ता तरी वनविभागाचे अधिकारी वनहक्क धारकांच्या मागण्याकंडे लक्ष देतात की कुंभक्रणी झोपेचे सोंंग घेऊन बसतात याकडे लक्ष लागले आहे.
लोकांवरील झालेले ऐतीहासीक अन्याय शासनानी कबुल केले वन हक्क कायद्यानी वनात लगत राहणारे व वनावर ज्यांचे उपजिविका निर्भर आहे अशा आदिवासी व ईतर पारंपारिक वन निवासी यांना सामुहिक वन हक्क व वनातील गौण उपज यावर स्वामित्व हक्क प्राप्त असुन सुद्धा वन विभागाच्या हिटलरशाही व जुल्मी अन्यायाच्या विरोधात वन हक्क प्राप्त ग्रामसभांचा एवढ्या लख-लखत्या उन्हात आमरण उपोषण (अन्नत्याग) आजचा सलग सहाव्या दिवशी उपोषणकर्ते नारायन सलामे, संतोष भोयर, जैराम केरामी यांची प्रकृती चिंता जनक झाली असुन त्यांना ग्रामिण रुग्नालयात दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments