शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११९ व्या जयंती समारोहाची जय्यत तयारी

0
300

गोंदिया : शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांचा ११९ वा जयंती समारोह ९ फेब्रुवारी रविवारला दुपारी १.०० वाजता डी.बी. सायन्स महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात आला आहे. समारोहात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री माननीय श्री पीयूष गोयलजी, खासदार श्री प्रफुल पटेलजी, तर प्रमुख अतिथी म्हणून जुबिलेंट लाइफसायंसेज चे प्रबंध निदेशक माननीय श्री हरी भरतीया, माजी खासदार माननीय श्री नरेश गुजराल, उद्योजक माननीय श्री मोहित गुजराल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन व जय्यत तयारीची पूर्व तयारी म्हणून कार्यक्रम स्थळाची पाहणी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केली. समारोहाला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिक विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती माजी आमदार व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव श्री राजेंद्र जैन यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here