Tuesday, April 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसौंदड ग्रामीण रुग्णालय इमारतीची आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोलेनी केली पाहणी

सौंदड ग्रामीण रुग्णालय इमारतीची आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोलेनी केली पाहणी

गोंदिया. सडक अर्जुनी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय इमारतीची पाहणी आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ही इमारत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाहणी दरम्यान रुग्णालयाच्या बांधकामाची गुणवत्ता, सोयी-सुविधा आणि परिसराच्या व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. आमदार बडोलेनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी रुग्णालयामध्ये उपलब्ध होणाऱ्या सेवांबाबत माहिती दिली. आमदार बडोले यांनी रुग्णालय कार्यान्वित होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या पाहणी प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, उपसभापती निशाताई काशीवार, जिल्हा परिषद सदस्य निशाताई तोडासे, कृ.उ.बा.स. सभापती डॉ. अविनाश काशीवार, पंचायत समिती सदस्य वर्षाताई शहारे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुर्हे,प्रभुदास लोहीया, उपअभियंता पवन फुंडे, महीलाध्यक्ष रजनीताई गिर्‍हिपुजे,सदुजी विठ्ठले,संदीप मोदी,चरणदास शहारे,ओमकार टेंभुर्णे,पुरुषोत्तम निंबेकर,शुभम जनबंधु, दिव्या बनकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments