Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorized14.43 कोटींची योजना पोहोचली 150 कोटींवर

14.43 कोटींची योजना पोहोचली 150 कोटींवर

झाशीनगर योजना शेतकºयांसाठी दिवास्वप्न
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात हरीतक्रांती घडवून आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री महादेवराव शिवणकर यांनी झाशीनगर सिंचन योजनेची पायाभरणी केली. मात्र, आज ही योजना येथील शेतकºयांसाठी दिवास्वप्न ठरली आहे. झाशीनगर योजनेला आॅक्टोबर 1996 मध्ये 14 कोटी 43 लाख रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली. आज ही योजना 150 कोटीवर पोहोचली आहे. आजही शेकडो एकर शेती सिंचनाच्या प्रतिक्षेत आहे. योजनेला उशिर होत असल्याने अधिकारी, कंत्राटदाराच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
तत्कालीन भाजपा-शिवसेना युतीच्या शासन काळात पाटबंधारे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी शेतकºयांसाठी हरित क्रांतीचे स्वप्न साकारणारी झाशीनगर उपसा सिंचन योजना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी गावाजवळ इटियाडोह प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात उत्तर दिशेला झाशीनगर उपसा सिंचन योजनेचा सन 1995-96 मध्ये प्रस्ताव तयार करण्यात आला. योजनेला 18 आॅक्टोबर 1996 मध्ये 14 कोटी 43 लाख रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली. योजनेत बुडीत क्षेत्रातून 25.23 दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा करून झाशीनगर, धाबेपवनी परिसरातील 12 आदिवासीबहुल गावातील 2 हजार 500 हे. आर. जमिन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले. योजना सन 2005-06 मध्ये पूर्णत्वास येणे अपेक्षीत होते. सन 2008 मध्ये तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी 45 कोटी 18 लाख रुपयांची सुधारीत प्रशासकिय मान्यता मिळवून दिली. हे काम सन 2011 पर्यंत कासवगतीने सुरू होते. अप्रोच चॅनलचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले होते. उर्ध्वनलिका मांडणीचे काम 50 टक्के पूर्ण झाले होते. मुख्य कालव्याचे 13.50 किमीपर्यंत मातीकाम 50 टक्के पूर्ण झाले होते. यानंतर लघु व उपलघुकालव्याचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र निधी अभावी हे काम पुर्णत्वास जाऊ सकले नाही. आज योजनेची सुधारीत किंमत 150 कोटींवर पोहचली आहे. 2021-22 मध्ये योजाना पुर्णत्वास आली असली तरी राजकीय पुढा‍ºयांच्या श्रेय वादामुळे शेती सिंचनाला मुकली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments