पॅक हाऊस ची तोडफोड : तिनसे पोते धानाची नासधुस, पोल्ट्री फार्मचे ही नुकसान
गोंदिया : गेल्या वर्षभरापासून अर्जुनी मोरगाव तालुक्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातच या हत्तीच्या कडपाचा मुक्काम असून आज तारीख 12 डिसेंबर रोजी रात्रौ बारा वाजेच्या दरम्यान कुरखेडा कडून राजोली, भरनोली मार्गे प्रतापगड काळीमाती जंगलातून हा हत्तीचा कळप अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी परिसरात दाखल झाला. असून बाराभाटी शेत शिवारात अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे घटनेची माहिती मिळतात माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली सोबतच तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, नवेगाव बांध प्रादेशिक चे वनपरिक्षेत्राधिकारी एस. जी. अवगान व वन विभागाचे अन्य कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली व त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
रानटी हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झाल्याने ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांसह वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. मागील शनिवारी 9 डिसेंबर रोजी वीस ते पंचवीस हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यातून कुरखेडा वरुन नागणडोह मार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झाला होता. नऊ डिसेंबरच्या रात्री राजोली, भरनोली येथील नीलकंठ हारमी यांचे शेतातील पाच एकरातील धाणाच्या पूजन्याची नासधुस करून हा हत्तीचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला 11 डिसेंबरला कुरखेडा जवळ सिंधपुरी गाव शिवारात असल्याची विश्वासनीय माहिती होती पुन्हा या हत्तीच्या कडपाने कुरखेडा मार्गे प्रतापगड काडीमाती जंगल परिसरातून थेट अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी येथे 12 डिसेंबरच्या रात्रौ बारा वाजेच्या दरम्यान शेत शिवारात वीस ते पंचवीस हत्तीचा कळप दाखल झाला. हत्तीच्या कडपाने बाराभाटी येथील शेतकरी पुराणलाल बेलखोडे, भोजराज बेलखोडे यांचे पॅक हाऊस व गांडूळ खत इमारतीची पूर्णतः नासधूस केली. असून या इमारतीमध्ये ठेवलेले 300 धानाच्या पोत्याची नासधुस केली आहे. तसेच गौरव दादाजी बेलखोडे यांच्या शेतात असलेल्या पोल्ट्री फार्म ची नासधुस केली. तसेच 19 धानाचे पोते उध्वस्त केले. आणि कंपाऊंड वालचे जाडी व पोल सुद्धा तोडले. सोबतच केळीचे झाडांची नासधुस करून दहा नारळाचे झाडे सुद्धा जमीन दोस्त केली आहे. तसेच हेमराज बेलखोडे, किशोर बेलखोडे, महेश बेलखोडे, भागवत बेलखोडे यांचेही धाणाचे पोत्यांची नासधुस करून शेतातील पोपट, हळद ,मिरची, तूर व उन्हाळी प-ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
*चौकट*
घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी बाराभाटी येथे शेत शिवारात जाऊन नुकसानग्रस्त परिसरांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. तहसीलदार व वन विभागाचे अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत देण्याची सूचना केली सोबत भाजपा तालुका महामंत्री लैलेश्वर शिवणकर, बाजार समितीचे संचालक व आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष व्यंकट खोब्रागडे, उपसरपंच किशोर बेलखोडे, नरेश खोब्रागडे, सरपंच भीमराव चर्जे, हिवराज औरासे व जवळपासचे शेतकरी उपस्थित होते.
*चौकट*
घटनेची माहिती प्राप्त होताच अर्जुनी मोरचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे ,नवेगाव बांध प्रादेशिक चे वनपरिक्षेत्राधिकारी एस .जी .अवगाण ,क्षेत्र सहाय्यक व्ही. एम. करंजेकर ,बीटरक्षक व्ही. एल. सयाम, वन मजूर एस. टी .राणे, नवेगाव बांधचे क्षेत्र सहाय्यक एल. व्ही. बोरकर हे घटनास्थळी दाखल झाले व त्वरित नुकसानीचे पंचनामे तयार केले अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तीच्या कडपाचे आगमन झाल्याने सर्व नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन करून रात्रीच्या सुमारास कुणीही शेतकरी यांनी शेतात जाऊ नये व खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाचे वतीने करण्यात आले. बाराभाटी शेतशिवारात नासधुस केल्यानंतर हत्तीचा कळप कवठा बोळदे काळीमाती परिसरातील जंगलाकडे गेले असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे .
बाराभाटी शेत शिवारात रानटी हत्तीचा धुमाकूळ
RELATED ARTICLES