देवरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा अपघात घडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी दुपारी सडक अर्जुनी तालुक्यात डव्वा परिसरात एसटी बस उलटल्याची घटना घडली होती. ज्यात अकरा प्रवाश्यांचा मृत्यू तर 29 प्रवाशी जखमी झाले होेते. तर आज (दि.30) शनिवार पहाटे 7 वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील देवरी शहराला लागुन असलेल्या अब्दुल टोला या ठिकानी विद्यार्थाना ने – आन करणारी मानव विकास संस्थेची बस क्रमांक एम.एच 40 ए.क्यू.6050 सदरील बस ही देवरी वरून चिचगड येथे जात असताना बस चालकाचा नियंत्रन सुटल्याने अपघाताची घटना घडली.
सुदैवाने यात कोणीही प्रवाशी नव्हते ज्यामुळे मोठी घटना टळली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक लोकांनी व पोलिसांनी तात्काळ मदत केल्यामुळे वेळीच मदत झाली. अचानक घडलेल्या या अपघाताच्या घटनेमुळे काही वेळ नागरीकांत गोंधळून गेले होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सदरील घटना घडली. बसचे देखील या घटनेत प्रचंड नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणी बस चालक व सहकारी यांची जीवित हानी टळली. एसटी बसचे वेळेवर मेंटेनन्स होत नसल्यामुळे इतर खाजगी वाहतुकीच्या प्रमाणात एसटी महामंडळाच्या बसचे अपघाताचे प्रमाण अधिक अधिक आहे. बस डेपोमधून निघण्या अगोदर तिचे ब्रेक व तपासणी करणे गरजेचे असते. जेणेकरून रस्त्यावर धावत असताना कुठली अपघाताची घटना घडू नये. पंरतु जिल्ह्यात सतत होत असलेल्या बसच्या अपघातामुळे प्रवाश्यांच्या मनात भितीचे वातावरन निर्मान झाले आहे.
पुन्हा बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, सलग दुसऱ्या दिवशी झाला अपघात
RELATED ARTICLES






