अवैध वाळुसह 27 लाख 9 हजारांचा माल जप्त, अर्जुनी मोरगाव महसूल विभागाची कार्रवाई

0
300

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या घाटातील रेतीचा उपसा करून रेतीची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अर्जुनी मोरगाव महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता नवेगाव/बांध येथे पकडून कारवाई केली. याप्रकरणी 27 लाख 9 हजार रूपये किमतीचा माल जप्त केला. यामध्ये ट्रक क्रमांक एम.एच 35,ए.जे 4239  किंमत 27 लाख रुपये तसेच 02 ब्रास रेती किंमत 9 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रक मालक शुभम विलास नागदेवे व ट्रक चालक राहुल सुकाली भोयर रा.कनेरी,ता.सडक अर्जुनी, जि.गोंदिया यांच्यावर जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दंडात्मक कार्रवाई करुन जप्त केलेल्या ट्रकला तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे जमा करण्यात आले. तर अर्जुनी मोरगाव महसूल विभागाने केलेल्या कार्रवाईमुळे तालुक्यातील अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदरची कार्रवाई अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात नवेगावबांधचे मंडळ अधिकारी उमराव वाघधरे व महसूल सेवक एस.के. सांगोळकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here