Tuesday, April 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री बाबासाहेब पाटील

गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री बाबासाहेब पाटील

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
गोंदिया :  समृद्ध भारत-विकसित भारत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत व तसा संकल्पही त्यांनी केला आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सदैव प्रयत्नशील आहे. पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण योगदान देईल अशी ग्वाही देतांनाच आपला महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने देशात अव्वल व गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल राहील यासाठी कटिबद्ध होऊया असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
प्रजासत्ताक दिनी आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस मुख्यालय मैदान कारंजा गोंदिया येथे आयोजित 76 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा व राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक अमोल गायकवाड मंचावर उपस्थित होते. सहकार विभागामार्फत राज्यातील 12 हजार प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार असून गोंदिया जिल्ह्यातील 121 सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. केंद्र पुरस्कृत जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 300 ते 1000 मे.टन क्षमतेचे गोदाम उभारणीबाबत कार्यवाही सुरु असून या योजनेअंतर्गत पुढील 100 दिवसात 100 गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कनेरी 1500 मे.टन, डोंगरगाव 500 मे.टन व गोठणगाव 500 मे.टन क्षमता असलेल्या या तीन संस्थांना मंजूरी देण्यात आलेली असून गोदामाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. पुढील 100 दिवसात सहकार विभागाअंतर्गत विविध सुविधा ऑनलाईन करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरविण्याकरीता 79 सेवा सहकारी संस्थांकडे सी.एस.सी. सेंटरचे कामकाज प्रत्यक्षात सुरु झालेले आहे असे पालकमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना अधिक समृध्द आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच, हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मीती म्हणजेच ‘ॲग्रीस्टॅक’ या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरु झाली आहे. ॲग्रीस्टॅक ही एक अशी क्रांतीकारक संकल्पना आहे जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते. यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते असे ते म्हणाले.

जिल्हा पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त परिसरात विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी पूर्ण करण्याच्या उद्देशाने ‘पोलीस दादालोरा खिडकी’ योजनेंतर्गत एक हात मदतीचा हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत 38 उपक्रमांतर्गत 9 हजार 145 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये एकूण 255 कोटी 48 लाख निधी खर्च झालेला असून त्यामधून 65 लाख 85 हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झालेली आहे. 1 लाख 81 हजार 878 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे असे त्यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले. राज्य राखीव पोलीस दल, पुरुष पोलीस दल, महिला पोलीस दल, पुरुष होमगार्ड पथक, महिला होमगार्ड पथक, माजी सैनिक दल, जे.एम. हायस्कूल गोंदिया, फुलचूर हायस्कुल फुलचूर, शहीद जान्या तिम्या जि.प. हायस्कूल गोरेगाव, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा रतनारा, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान पथक, रुग्णवाहिका व अग्नीशमन दल यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी भारत सरकारच्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तसेच ई-सिगारेट बंदीबाबतच्या 18 सप्टेंबर 2019 च्या अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता आज प्रजासत्ताक दिनानिमीत्त तंबाखु मुक्तीची सामुहिक शपथ घेण्यात आली.

ध्वजारोहणानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा आणि ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल शालिकराम लिचडे, राजकुमार नागपूरे, भैय्यालाल रहमतकर, नोकचंद कापसे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, माजी जि.प.अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांचेसह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments